Shreya Ghoshal ने शेअर केली मुलाची पहिली झलक, नाव ठेवलं Devyaan Mukhopadhyaya
Shreya Ghoshal | Photo Credits: Twitter

गोड गळ्याची बॉलिवूड मधील सध्या आघाडींच्या गायिकांपैकी एक श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) काही दिवसांपूर्वीच आई झाली आहे. श्रेयाने 22 मे दिवशी एका मुलाला जन्म दिल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यानंतर आज श्रेयाने बाळाची पहिली झलक आणि नाव चाहत्यांसोबत शेअर केली आहे. श्रेयाने तिच्या मुलाचं नाव देवयान ठेवलं आहे. पती शिलादित्य सोबतचा तिचा आणि बाळाचा एक मोहक क्षण सोशल मीडीयात शेअर करत तिने सुखद धक्का दिला आहे. (नक्की पहा: सुप्रसिद्ध गायिका Shreya Ghoshal ने कोरोना काळात अशा पद्धतीने साजरे केले आपले डोहाळे जेवण).

'देवयान मुखोपाध्याय' (Devyaan Mukhopadhyaya) ची ओळख करून द्ते. 22 मे दिवशी त्याचा जन्म झाला आणि आमचं सारं जग बदलून गेलं. अशा आशयाची एक पोस्ट करत तिने तिघांचा फोटो शेअर केला आहे. दरम्यान देवयान चा अर्थ 'देवाचा सेवक' असा होतो.

इथे पहा श्रेया घोषालच्या लेकाचा फोटो

दरम्यान श्रेया घोषालचा आवाज बॉलिवूड सोबतच अनेक मराठी सिनेमांचाही चेहरा आहे. मराठी मध्ये श्रेयाने अजय अतुल, समीर साप्तीस्कर, मिलिंद जोशी सोबत काम केले आहे. 2010 साली 'जोगवा' सिनेमातील 'जीव रंगला' या मराठमोळ्या गाण्यासाठी नॅशनल अवॉर्ड देखील जिंकला आहे. मराठी सिनेक्षेत्रात मागील काही महिन्यांत प्रियंका बर्वे, शशांक केतकर, आरोह वेलणकर, निपुण धर्माधिकारी यांच्या घरातही चिमुकल्यांचं आगमन झालं आहे. आता लवकरच यंदाची राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रविंद्र देखील आई होणार आहे. तिने नुकतीच ही गोड बातमी शेअर करत पती सोबत खास फोटोसेशन मधील फोटो शेअर केले आहेत.