अभिनेत्री केतकी चितळे हिला शिवसेना नेत्याची धमकी; शिवाजी महाराजांवरील पोस्ट वरून अद्याप वाद सुरूच
Ketaki Chitale (Photo Credits: Facebook)

अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) संदर्भात केलेल्या एका पोस्ट मुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली होती. स्टॅन्ड अप कॉमेडियन अग्रीमा जोशुआ (Agrima Joshua) हिने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यावर तिचं समर्थनार्थ केतकी ने फेसबुक वर एक पोस्ट केली होती ज्यात तिने सुद्धा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता तसेच शिवभक्तांवर सुद्धा अनेक जहाल आरोप लगावले होते. यापोस्ट वरून सुरु झालेल्या चर्चेत आता एक वेगळेच वळण आले आहे. केतकीच्या पोस्टला अनेकांनी विरोध केला, त्यावर टीका केल्या पण आता एका शिवसेना (Shivsena) नेत्याने तिला सुनावल्याने पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. केतकीला वैयक्तिक मॅसेज करून शिवसेना विभागप्रमुखाने धमकवल्याचे समजत आहे. केतकीने स्वतः या मॅसेजचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे.

केतकी चितळे ची शिवाजी महाराजांवरील पोस्ट पाहा एका क्लिक वर 

केतकीने या पोस्टमध्ये ‘शिवसेना अध्यक्ष प्रमुख आणि तरीही यांना पोस्ट कळली नाही. हे आहेत नेते, ज्यांना मराठी कळत नाही. कळतं काय तर लोकांचे पर्सनल नंबर घेऊन, त्यांच्यावर खोटे आरोप करून, त्यांना धमक्या देणे!’ असे म्हटले आहे. त्याचबरोबर तिने काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या मॅसेज मध्ये शिवसेना नेत्यांनी ‘महाराजांच्या नावाचा उल्लेख एकेरी करता तुम्ही आणि हसता… महाराष्ट्रामध्ये राहून त्यांच्या जीवावर नाव कमावले आणि आज त्यांचा एकेरी उल्लेख करता… मी शिवसेना विभाग प्रमुख आहे. पुन्हा खोटारडे लोक असा शब्द केला ना.. मग बघ,’ असे म्हटले आहे.

केतकी चितळे पोस्ट

 दरम्यान, शिवाजी महाराजांवर केतकीने केलेल्या टिप्पणीवर सिनेसृष्टीतूनही विरोध केला गेला, दिगदर्शक महेश टिळेकर यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहित तिच्यावर कारवाईची मागणी केली होती. अग्रीमा जोशुआ ला धमकी देणे हे जितके गैर आहे तितकेच तिने केलेले कमेंट्सही चुकीचे आहेत अशी भावना अनेक शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.