Tu Desh Mera (Photo Credits: Instagram)

भारतीय जवानांवरील सर्वात मोठा हल्ला फेब्रुवारी 2019 मध्ये झाला. या हल्ल्यामध्ये 40 जवानांना ग्रेनेड हल्ल्यामध्ये आपले प्राण जागीच गमवावे लागले होते. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा भाग असणार्‍या CRPF जवानांवरील या हल्ल्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आता बॉलिवूड सेलिब्रिटी एकवटले आहेत. 'तू देश मेरा' (Tu Desh Mera) या गाण्यासाठी आता शाहरूख खानने (Shah Rukh Khan) खास शूटिंग केलं आहे. यापूर्वी या गाण्यासाठी रणबीर कपूर (Ranbir Kapoor), ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी चित्रीकरण केलं आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरूख खानने त्याचा 4 मिनिटांचा व्हिडिओ मुंबईतील एका स्टुडिओमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. शाहरूखनेही त्याच्या या गाण्यातील सहभागाबद्दल आनंद आणि शहीदांप्रती कृतज्ञाता व्यक्त केली आहे. Pulwama Terror Attack: दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेले CRPF जवान म्हणजे नेमके कोण? सुरक्षा व्यवस्थेमध्ये काय असते त्यांची जबाबदारी?

CRPF Tweet  

'तू देश मेरा' या गाण्याचा टीझर यंदा 15 ऑगस्ट दिवशी रीलिज करण्यात येणार आहे. यामध्ये आमिर खान, रणबीर कपूर यांची झलक पाहता येणार आहे. अद्याप या गाण्याचा संपूर्ण व्हिडिओ कधी रिलीज केला जाईल याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

पुलवामा हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान देशामधील संबंध ताणले गेले आहेत. या भ्याड हल्ल्याचा निषेध जगभरातून करण्यात आला आहे.