Sex Video Shoot च्या अॅपवर Raj Kundra कडून अपलोड केले जायचे व्हिडिओ, प्रतिदिनी व्हायची लाखोंची कमाई
हॉट शॉट्स अॅप (स्क्रीन शॉट)

Raj Kundra Pornography Case: उद्योगपती राज कुंद्रा याच्या अटकेनंतर पोनोग्राफी प्रकरणी नवीन खुलासे होत आहेत. मुंबई पोलिसांकडून हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर आता असे समोर आले आहे की, पॉर्न अॅप हॉट शॉट्स द्वारे राज कुंद्रा यांना दररोज 9.65 लाख रुपये मिळायचे. हॉट शॉट एक स्वत:ला भारतीय चित्रपट आणि वेब सीरिजमधील सर्वश्रेष्ठ असल्याचे मानत होते. अॅपवर व्हिडिओ कंन्टेट पाहण्यासाठी युजर्सला एक प्लॅनसह सब्सक्रिप्शन घ्यावे लागत असे.

या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांनी स्ट्रगल करणाऱ्या अभिनेत्यांसह अभिनेत्रींना अश्लील फिल्ममध्ये नग्न अश्लील शूट करण्यासाठी जबरदस्ती केल्याच्या आरोपाखाली 9 जणांना अटक केली होती. शूट करण्यात येणारे व्हिडिओ मोबाइल अॅप आणि काही वेबसाइटवर स्ट्रिम केले जात होते. तसेच काही सोप ओपेरा मध्ये काम करणारी गहना वशिष्ठ सुद्धा या प्रकरणातील मुख्य आरोपील असल्याचे ही बोलले जात आहे. व्हिडिओ कथित रुपात ब्रिटेनमध्ये मोबाइल अॅप जसे हॉटशॉटस, न्यूफ्लिक्स आणि हॉटहिटवर अपलोड करण्यात आले होते.(Raj Kundra & Digital Pornography: अरे तो Umesh Kamat मी नव्हे! प्रसारमाध्यमांच्या बेजबाबदारपणावर मराठी अभिनेता उमेश कामत याच्याकडून संताप, कारवाईचाही इशारा)

अटक करण्यात आलेल्या लोकांमदअये रोवा खान उर्फ यास्मीन हिचा समावेश आहे. जी स्वत:ला को-प्रोड्युसर- डायरेक्टर असल्याचे सांगते. पोलिसांनी खान हिचा नवरा दीपांकर खासनवीर उर्फ श्याम बॅनर्जी याला सुद्धा अटक केली आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, त्याच्या सुद्धा कंपनीत हिस्सा आहे. ज्याने ते अॅप सुरु केले आणि त्यावर अश्लीलसह पॉर्न कंन्टेट दाखवले जात होते. यास्मीन आणि खसनवीस दोघेही हॉट हिट डिजिटलशी जोडलेले आहेत.

दरम्यान ANI नुसार, राज कुंद्राच्या मोबाईल रिकॉर्डिंगवरुन असे समोर आले की, हॉट हिट मधून दररोज पैसे मिळायचे. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांकडून पॉर्न रॅकेटचा पर्दाफाश करण्यापूर्वीच कुंद्रा याला हॉट हिट येथून 3 फेब्रुवारीला 2.7 लाख रुपये मिळाले होते. अशाप्रकारे त्याला 23 जानेवारीला 05 हजार रुपये आणि 20 जानेवारीला 1 लाख, 13 जानेवारीला दोन लाख आणि 10 फेब्रुवारीला 3 लाख रुपये मिळाले होते.