Sanjay Dutt (Photo Credits: File Photo)

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याला 8 ऑगस्ट रोजी प्रकृती अस्वास्थ्यामळे मुंबईतील  (Mumbai) लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने संजय दत्त याला तातडीने रुग्णालयात आणल्यावर तेथे त्याची कोरोना चाचणी देखील करण्यात आली. दरम्यान संजय दत्त याची कोरोना चाचणीचे रिपोर्ट्स नेगेटीव्ह आले आहेत. संजय दत्त याला अचानक अॅमिट करायला लागल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे खुद्द संजय दत्त याने ट्विट करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

मी सर्वांना सांगू इच्छितो की मी ठीक आहे. मी सध्या वैद्यकीय निगराणीखाली असून माझा कोविड-19 चा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. लीलावती हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर स्टाफच्या सहकार्याने आणि काळजीने मी एक-दोन दिवसांत घरी जाईन. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद. असे संजय दत्त याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (Sanjay Dutt Admitted To Lilavati Hospital: अभिनेता संजय दत्त मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल)

Sanjay Dutt Tweet:

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता दत्त आणि मुले दुबईत अडकले आहेत. तर संजय दत्त मुंबईत आहे. त्यामुळे अनेकदा आपल्या कुटुंबियांच्या आठवणीत संजय दत्त सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.