Sanjay Dutt Admitted To Lilavati Hospital: अभिनेता संजय दत्त मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल
Actor Sanjay Dutt (PC - ANI)

Sanjay Dutt Admitted To Lilavati Hospital: अभिनेता संजय दत्त मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाला आहे. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. सध्या त्याची प्रकृती चांगली आहे. यासंदर्भात लीलावती रुग्णालयाच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

दरम्यान, आज मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 304 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली असून 58 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे  शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 1 लाख 22 हजार 331 इतकी झाली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे. (हेही वाचा - Rana Daggubati And Miheeka Bajaj's Wedding: खिलाडी अक्षय कुमार ने लग्नाच्या बेडीत अडकणा-या राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज ला आपल्या विनोदी अंदाजात दिल्या हटके शुभेच्छा, पाहा ट्विट)

दरम्यान, आज राज्यात 12,822 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 275 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 5 लाख 3 हजार 84 इतका झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 47 हजार 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.