Rana Daggubati And Miheeka Bajaj's Wedding: खिलाडी अक्षय कुमार ने लग्नाच्या बेडीत अडकणा-या राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज ला आपल्या विनोदी अंदाजात दिल्या हटके शुभेच्छा, पाहा ट्विट
Rana Daggubati And Miheeka Bajaj and Akshay Kumar (Photo Credits: Instagram)

बाहुबली चित्रपटातून भल्लालदेव पात्र साकारून लोकांच्या कौतुकास पात्र ठरलेला अभिनेता राणा दग्गुबाती (Rana Daggubati) आज बोहल्यावर चढणार आहे. मिहिका बजाज (Miheeka Bajaj) हिच्यासोबत राणा आज विवाहबंधनात अडकणार आहे. लॉकडाऊन मुळे त्याच्या लग्नसोहळ्यात जाता न आल्यामुळे त्याच्या मित्रपरिवाने, नातेवाईकांनी आणि सह कलाकारांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून त्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात खिलाडी अक्षय कुमारने आपल्या नेहमीच्या विनोदी अंदाजात त्याला ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

राणा आणि मिहिकाच्या लग्नाच्या शुभेच्छा देत अक्षर कुमारने "आयुष्यभरासाठी लॉकडाऊनमध्ये अडकण्याची हीच योग्य वेळ आहे." असे मजेशीर रित्या सांगत दोघांनाही जीवनभराच्या आनंदासाठी खूप सा-या शुभेच्छा असे म्हटले आहे. Rana Daggubati And Miheeka Bajaj's Wedding Photos: राणा दग्गुबाती आज मिहिका बजाज सोबत बांधणार लग्नगाठ, सोशल मीडियावर फोटो चर्चेत

दरम्यान मिहिकाच्या घरी मेहंदी आणि हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

यात 30 लोकच लोक सामील असतील. हे लग्न तेलुगू आणि मारवाडी या दोन्ही पद्धतीने होईल. मिडिया रिपोर्ट्सनुसार, या लग्नात येणा-या सर्व पाहुण्यांची कोविड-19 ची चाचणी करण्यात येणार आहे. तसेच लग्नसोहळ्यात प्रत्येक ठिकाणी सॅनिटायजर ठेवण्यात येईल आणि सोशल डिस्टंसिंगचे पालनही केले जाईल.

सांगायचेच झाले तर, राणा दग्गुबाती ने अक्षय कुमार सोबत 'बेबी' आणि 'हाऊसफुल 4' मध्ये काम केले होते. दरम्यान या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.