Rana Daggubati - Miheeka Bajaj | Photo Credits: Instagram

बाहुबली (Bahubali) चा भल्लालदेवा म्हणजेच तेलगु सिनेमाचा चमकता तारा राणा दग्गुबाती (Rana Daggubatti) आज आपली गर्लफ्रेंड मिहिका बजाज (Mihika Bajaj) सोबत लग्नगाठ बांधणार आहे. कोरोना व्हायरसचे (COVID 19)  संंकट असतानाही शक्य तितकी सर्व खबरदारी बाळगत अगदी शाही स्वरुपात हा विवाह सोहळा पार पडणार आहे. अर्थात सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या फोटोज मधुन तुम्ही हा अंदाज लावु शकाल. हैदराबाद येथील रामानायडू स्टुडियो मध्ये हा लग्न सोहळा पार पडणार असुन यात दोघांचे कुटुंब आणि अगदी जवळची मंंडळी उपस्थित असणार आहेत. तेलगु आणि मारवाडी परंपरेच्या नुसार हे लग्न पार पडेल. तत्पुर्वी आपण या शाही विवाह सोहळ्याच्या वेन्यु वरुन काही खास फोटो पाहुयात.. Rana Daggubati-Miheeka Bajaj Engagement: बाहुबली फेम राणा दग्गुबाती ने And it’s official!! म्हणत शेअर केले गर्लफ्रेंड मिहिका बजाज सोबत साखरपुड्याचे खास फोटो

राणा दग्गुबाती याने काही वेळापुर्वी आपल्या लग्नाच्या ठिकाणहुन एक फोटो शेअर केला आहे, यामध्ये राणा सोबत अभिनेता वेंकटेश आणि सुरेश बाबु दिसुन येत आहे.

हेदेखील वाचा- अभिनेता राणा दग्गुबाती च्या होणा-या बायकोने मास्क घालून केले झकास प्री-वेडिंग फोटोशूट (See Pics)

राणा दग्गुबाती फोटो

 

View this post on Instagram

 

Ready!! 💥💥💥

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Indian Express Entertainment (@ieentertainment) on

कालच राणा आणि मिहिका यांचा हळदी समारंंभ सुद्धा झाला होता, यावेळी सुद्धा त्यांचे स्टायलिश आणि तितकेच रोमॅंटिक फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळाले होते.

राणा आणि मिहिका यांची हळद

 

View this post on Instagram

 

A post shared by The ShaadiSwag 💞 (@theshaadiswag) on

 

View this post on Instagram

 

A post shared by NBT Hindi News (@nbt_hindi_news) on

सोशल मीडियावर मिहिका बजाज चे वेडिंंग लूक सुद्धा अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत.

मिहिका बजाज वेडिंग लूक

 

View this post on Instagram

 

A post shared by NBT Hindi News (@nbt_hindi_news) on

दरम्यान, या लग्नासाठी केवळ 30 पाहुणे उपस्थित असणार आहेत आणि या सर्वांची आधी च कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. राणा दग्गुबाती याने 21 मे रोजी मिहिका सोबत साखरपुड्याचे फोटो शेअर करुन आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले होते.