Rana Daggubati-Miheeka Bajaj Engagement: बाहुबली फेम राणा दग्गुबाती ने And it’s official!! म्हणत शेअर केले गर्लफ्रेंड मिहिका बजाज सोबत साखरपुड्याचे खास फोटो
Rana Daggubati - Miheeka Bajaj | Photo Credits: Twitter

बाहुबली फेम राणा दग्गुबाती (Rana Daggubati) आणि त्याची गर्लफ्रेंड मिहिका बजाज (Miheeka Bajaj) यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. अबोली रंगाच्या कांजिवरम साडीतील मिहिका आणि पांढर्‍या पारंपारिक दाक्षिणात्य कपड्यांमधील राणा यांचा एकत्र फोटो शेअर करत And it’s official!! या कॅप्शनसह राणाने सोशल मीडीयामध्ये त्यांच्या साखपुड्याचे काही फोटो शेअर केले आहेत. आठवड्याभरापूर्वीच राणाने मिहिकाबरोबरचा फोटो शेअर करत तो रिलेशनशीपमध्ये असल्याची माहिती रसिकांबरोबर शेअर केली होती. बाहुबली फेम अभिनेता राणा दुग्गबती लवकरच अडकणार लग्नबेडीत; प्रेयसी मिहिका बजाज चा फोटो शेअर करत दिली माहिती.

राणा दग्गुबाती हा तेलगू सिनेक्षेत्रात प्रसिद्ध अभिनेता आहे. तर मीडीया रिपोर्ट्सनुसार, मिहिका Drew Drop Design Studio या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची संस्थापिका आहे. मिहिकाचा सिनेक्षेत्राशी थेट संबंध नाही. मात्र मिहिका अभिनेत्री सोनम कपूरच्या जवळ असल्याचं सांगितलं जातं. राणा दग्गुबाती काही वर्षांपूर्वी जगभर धुमाकूळ घातलेल्या बाहुबली सिनेमामध्ये भल्लालदेव या भूमिकेत दिसला होता.

राणा-मिहिकाचे फोटो 

राणा-मिहिकाचे आनंदी फोटो पाहून रसिकांसोबतच सायना नेहवाल सह अनेक मान्यवरांनीही या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. राणा दग्गुबाती 'फिल्म हाथी मेरे साथी' या आगामी सिनेमामधून रसिकांच्या समोर येणार आहे. मात्र कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट लांबणीवर पडला आहे.