बाहुबली फेम अभिनेता राणा दुग्गबती लवकरच अडकणार लग्नबेडीत; प्रेयसी मिहिका बजाज चा फोटो शेअर करत दिली माहिती
बाहुबली फेम अभिनेता राणा दुग्गबती लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. राणा दुग्गबती याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रेयसीचा फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. मिहिका बजाज असं त्यांच्या प्रेयसीचं नाव आहे. राणाने मिहिका सोबत शेअर केलेल्या फोटोला 'आणि तिने होकार दिला,' असे कॅप्शन दिले आहे. मिहिका ही इंटेरिअर डिझायनर असून 'ड्यू ड्रॉप डिझाईन' या स्टुडिओ या कंपनीची मालकीण आहे. 'ड्यू ड्रॉप डिझाईन' ही एक इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे. विशेष म्हणजे मिहिकाची आई बंटी बजाज ही ज्वेलरी डिझायनर आहे.
बाहुबली फेम अभिनेता राणा दुग्गबती (Rana Daggubati) लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. राणा दुग्गबती याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रेयसीचा फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. मिहिका बजाज (Miheeka Bajaj) असं त्यांच्या प्रेयसीचं नाव आहे. राणाने मिहिका सोबत शेअर केलेल्या फोटोला 'आणि तिने होकार दिला,' असे कॅप्शन दिले आहे. मिहिका ही इंटेरिअर डिझायनर असून 'ड्यू ड्रॉप डिझाईन' या स्टुडिओ या कंपनीची मालकीण आहे. 'ड्यू ड्रॉप डिझाईन' ही एक इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे. विशेष म्हणजे मिहिकाची आई बंटी बजाज ही ज्वेलरी डिझायनर आहे.
लॉकडाऊनमध्ये चांगली बातमी मिळाल्याने राणाचे चाहते प्रचंड खूश आहेत. राणा आणि मिहिकाच्या फोटोला अनेकांना लाईक तसेच कमेंन्टस केल्या आहेत. दाक्षिणात्य तसेच बॉलिवुडमधील अनेक कलाकांरांनी राणा आणि मिहिकाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. (हेही वाचा - एकटं कुणी नाहीये! मराठी कलाकार अमेय वाघ, सखी गोखले, रुचा आपटे, पर्ण पेठ, सुजय जाधव यांचे कोरोनावर रॅप साँग; पहा प्रेरणादायी व्हिडिओ)
'बाहुबली' या चित्रपटामुळे राणा दुग्गबती ला चांगलीचं प्रसिद्धी मिळाली. राणाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तसेच काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘बाहुबली’ मधील भूमिकेमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली. सध्या राणाने आपला आगामी चित्रपट ‘हाथी मेरे साथी’साठी 30 किलो वजन कमी केले आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 12, 2020 08:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

