एकटं कुणी नाहीये, मराठी रॅप साँग (PC - Twitter)

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत तीन वेळा लॉकडाऊनचा काळावधी वाढवला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कारोना रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण देश बंद असल्याने लाखो लोकांचा रोजगार हिरावला आहे. कोरोनामुळे आलेल्या निराशेला दूर करण्यासाठी मराठी कलाकारांनी एका रॅप साँगची (Rap Song) निर्मिती केली आहे. हे रॅप साँग गाऊन कलाकार देशवासीयांना कोरोना विरोधातील लढण्यासाठी प्रेरणा देत आहेत.

या रॅप साँग मराठी कलाकार अमेय वाघ, सखी गोखले, रुचा आपटे, पर्ण पेठ, सुजय जाधव यांनी मिळून तयार केले आहे. ‘एकटं कोणी नाहीये’ असं या रॅप साँगचे बोल आहेत. MAHARASHTRA DGIPR या ट्विटर हँडलवरुन या रॅप साँगचा व्हिडीओ शेअर करण्यात आल आहे. (हेही वाचा - महेश मांजरेकर यांनी कोविड योद्धांसाठी रचले 'We Can, We Shall' हे गाणे, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकरसह अनेक मराठी कलाकारांचा सहभाग, Watch Video)

‘एकटं कोणी नाहीये’ या रॅप साँगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या गाण्याला सौरभ भालेराव यांनी संगीत दिलं आहे. हा व्हिडिओ अनेक युजर्संनी शेअर केला आहे. तसेच आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. याअगोदर अनेक बॉलिवुड तसेच मराठी कलाकारांनी कोरोना विरोधातील लढाईत नागरिकांना प्रेरणा मिळावी यासाठी प्रेरणादायी गाण्यांचे व्हिडिओ शेअर केले आहेत.