कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये आहे. लॉकडाउन दरम्यान अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईच्या डबेवाल्यांना (Mumbai's Dabbawalas) मोठा फटका बसला आहे. डबेवाल्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिलेले आहे. याबाबत डब्बेबाल्यांनी राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेते संजय दत्त (Sanjay Datt) यांनी मुंबईच्या डब्बेवाल्यांच्याबाबतीत ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान, ते म्हणाले की, मुंबईचे डब्बेवाले गेल्या अनेक वर्षांपासून आपली सेवा करत आहेत. तसेच आपल्याला जेवण पुरवत आहेत. यामुळे या कठीण परिस्थितीत आपण त्यांना सरकार्य करणे गरजेचे आहे, असे ट्वीट त्यांनी केले आहे.
संजय दत्त यांनी अनेकदा मदतकार्य करण्यासाठी पुढे आले आहेत. लॉकडाउनच्या काळात संजय दत्त यांनी एक हजार परिवारांना खाण्यापिण्याची सोय करण्याची जबाबदारी घेतली होती. सध्या आपण मोठ्या संकटाचा सामना करत आहोत. या कठिण परिस्थितीत प्रत्येकांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. लोकांना अन्न उपलब्ध करुन देणे आपल्या समाजासाठी आणि देशासाठी मोठे योगदान आहे. दरम्यान, मला सर्वांसोबत उभा राहण्याची संधी मिळाली आहे. यासाठी मी स्वताला भाग्यवान समजतो, असेही संजय दत्त म्हणाले होते. हे देखाल वाचा- सोनू सूद स्थलांतरित मजूरांना रवाना करण्यासाठी बांद्रा टर्मिनसवर पोहोचला असता रेल्वे पोलिसांनी अडवले; फलाटावर जाण्यासाठी दिली नाही परवानगी
संजय दत्त यांचे ट्वीट-
The dabbawalas have been serving us for decades & bringing food to so many Mumbaikars. Now is the time when we should come forward and support them! @CMOMaharashtra @AUThackeray @SunielVShetty https://t.co/n6g4r3IrvP
— Sanjay Dutt (@duttsanjay) June 8, 2020
मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांची डबेवाल्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. यावेळी डबेवाल्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवीन, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे. तसेच यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते सोमवारी डबेवाल्यांना 2 हजार 500 रेशन किटचे वितरण करण्यात आले होते.