Sonu Sood (Photo Credits: Facebook)

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) स्थलांतरित मजूरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी जी मदत करत आहे, त्यामुळे अनेकांसाठी देवदूत बनला आहे. त्यांच्या या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात असून दुस-या बाजूला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याच्यावर टिका केली आहे. मात्र सोनू सूद ने आपल्या कार्य चालूच ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी (8 जून) ला स्थलांतरित मजूरांना (Migrant Workers) रवाना करण्यासाठी सोनू सूद बांद्रा टर्मिनसमध्ये पोहोचला असता रेल्वे पोलिसांनी त्याला अडवले. इतकच नाही तर त्याला प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी देखील दिली नाही.

सांगितले जात आहे, या मजूरांना मुंबईहून आजमगढ़ जाणा-या रेल्वेने पाठविण्यात येणार होते. अशा वेळी सोनू सूद स्वत: त्याला निरोप देण्यासाठी ब्रांदा टर्मिनसवर पोहोचला. मात्र त्याला फलाटावर जाण्याची परवानगी न मिळाल्यामुळे फलाटाबाहेरच मजूरांना भेटून परत जावे लागले.

हेदेखील वाचा- अभिनेता सोनू सूद च्या चांगल्या कामांमागे कोणीतरी राजकीय दिग्दर्शक असण्याची शक्यता- संजय राऊत

एबीपी न्यूज ने दिलेल्या रिपोर्टनुसार, सोनू 45 मिनिटे रेल्वे पोलिसांच्या कार्यालयात बसून त्यांच्याशी चर्चा करत होता. चर्चेनंतर सोनू जसा कार्यालयातून बाहेर पडला तसे सर्व मजूरांनी त्याला घेरले. त्यांचे असे म्हणणे होते की रेल्वेत जागा नसल्यामुळे त्यांना त्या रेल्वेत प्रवेश दिला नाही.

मात्र सोनू ने त्या सर्वांना आश्वासन दिले की, लवकरच त्यांना त्यांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था केली जाईल. सोनू ला जेव्हा प्लॅटफॉर्मवर का जाऊ दिले नाही याबाबत विचारले असता "आपल्याला या गोष्टीचा काही फरक पडत नसून मी आपल्या कामावर विश्वास ठेवतो" असे सांगितले.