अभिनेता सोनू सूद च्या चांगल्या कामांमागे कोणीतरी राजकीय दिग्दर्शक असण्याची शक्यता- संजय राऊत
Sanjay Raut & Sonu Sood (Photo Credits: Twitter)

अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने आतापर्यंत लाखो स्थलातंरित मजूरांना त्यांच्या गावी पोहोचविण्याचे केले आहे किंबहुना करत आहे. स्थलांतरित मजूरांना बस आणि खाजगी विमानातून सोनूने त्यांच्या गावी पाठविण्याचे काम केले आहे. लॉकडाऊनच्या काळात सोनूच्या या मदतीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. इतकंच काय तर काही स्थलांतरित मजूरांनी आपल्या गावी जाऊन सोनूचा पुतळा बनविण्याचे ठरविले आहे. अनेक जण तर त्याची आरती ओवाळत आहे. सोशल मिडियावर सोनूला स्थलांतरित मजूरांसाठी बनलेला देवदूत असे संबोधण्यात येत आहे. मात्र आज सामनाच्या अग्रलेखातून सोनू सूद ला'महात्मा सोनू' (Mahatma Sonu) म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी टोला मारला आहे. त्यातच आता संजय राऊतांनी एक वेगळंच वक्तव्य केलं आहे. सोनू सूद च्या चांगल्या कामांमागे कोणीतरी राजकीय दिग्दर्शक (Political Director) असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.

सोनू सूद हा चांगला अभिनेता आहे. मात्र त्याच्या चित्रपटाचा दिग्दर्शक वेगळा असतो. म्हणून सोनू सूदच्या चांगल्या कामांमागे कोणीतरी राजकीय दिग्दर्शक असण्याची शक्यता आहे असे संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. स्थलांतरीत मजूरांना केलेल्या मदतीनंतर 'महात्मा सोनू' म्हणत सामना अग्रलेखातून संजय राऊत यांचा अभिनेता सोनू सूद याला टोला

दरम्यान कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत मजूरांना स्वगृही परतण्यासाठी मदत करणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याच्यावर आज सामना अग्रलेखातून शिवसेना खासदास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निशाणा साधला आहे. यावर 'महात्मा सोनू' (Mahatma Sonu) असा टोला राऊत यांनी अग्रलेखातून लगावला आहे. स्थलांतरीत मजूरांना मदत केल्यानंतर सोनूचे सर्वच स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे. यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, "लॉकडाऊन काळात सोनू सूद हा नवा महात्मा अचानक प्रकट झाला." "इतक्या पटकन आणि सहज कोणाला महात्मा बनवले जाऊ शकते का?" असा सवालही त्यांनी विचारला. विशेष म्हणजे सोनूच्या कार्याबद्दल राज्यपालांनी देखील सूद याला शाब्बासकी दिली. यावरुन असे दिसते की, स्थलांतरीत मजूरांच्या प्रश्नाबद्दल केंद्र आणि राज्य सरकारने काहीही पाऊले उचलली नाहीत, असेही ते म्हणाले.