Samantar 2 Official Teaser: स्वप्नील जोशी, नितिश भारद्बाज, तेजस्विनी पंडित  'समांतर 2' मधून येणार रसिकांच्या भेटीला; इथे पहा टीझर
Swwapnil Joshi | (Instagram)

समांतर या वेब सीरीजला प्रेक्षकांच्या मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता समांतर 2 ची उत्सुकता रसिकांना लागली आहे. दरम्यान आजच या वेब सीरीजचा टीझर लॉन्च करता ट्रेलर 21 जूनला येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित, स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज यांच्या अभिनयाने सजलेली ही गूढकथा आता अधिकच रंगतदार होणार आहे. तेजस्विनीने आज टीझर शेअर करताना दोन काळ, दोन व्यक्ती, आणि एक रहस्य!

पहा पुढे काय घडणार कुमार च्या आयुष्यात, Samantar2 मध्ये! असं कॅप्शन देत टीझरची झलक शेअर करून रसिकांच्या मनात उत्सुकता वाढवली आहे.

समांतर 2 टीझर

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

समीर विद्वंस याने समांतर 2 वेब सीरीज दिग्दर्शित केली आहे. यामध्ये स्वप्नील जोशी कुमार महाजनची भूमिका साकरली आहे. तर तेजस्विनी त्याची पत्नी आहे. दरम्यान स्वप्नील ने साकरलेला कुमार अभिनेते नितेश भारद्वाज यांचा म्हणजेच म्हणजेच सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेत त्याच्या भविष्यात काय घडणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान यामध्येच चक्रपाणी यांनी त्यांचा भूतकाळ आणि कुमारचा भविष्यकाळ असलेली डायरी कुमारला दिलेली पहिल्या सीझन मध्ये बघायला मिळते. आता दुसर्‍या सीझन मध्ये अजून एका महिला पात्राचा समावेश होणार आहे. त्यामुळे ती नेमकी कोण असेल? या प्रश्नाची देखील आता रसिकांना उत्सुकता असेल.

दरम्यान आता कोरोना संकटातील दुसरी लाट ओसरू लागल्याने चित्रिकरण पुन्हा हळूहळू सुरू झालं आहे. रसिकांना लवकरच नव्या मालिका, सिनेमे यांच्यासह वेब सीरीज देखील बघायला मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीतही आता बडे कलाकार वेब सीरीज मध्येही आपलं नशीब आजमावून बघत आहेत. नव्या विषयांना हाताळत आहेत.