चित्रपटात न्यूड सीन देण्याबाबत काय म्हणाला राजकुमार राव; वाचा पूर्ण माहिती
Rajkumar Rao | (Instagram)

राजकुमार राव (Rajkummar Rao) हा आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक. कोणाचंही पाठबळ नसताना, कुणाच्याही ओळखीच्या जीवावर किंवा घराण्याच्या नावावर बॉलीवूडमध्ये दणक्यात प्रवेश न करता हळू हळू आपलं स्थान निर्माण करणाऱ्या दर्जेदार अभिनेत्यांमध्ये राजकुमारचं नाव घेता येईल. 'मेड इन चायना' (Made In China) हा त्याचा सिनेमा मागच्याच आठवड्यात रिलीज झाला. प्रदर्शनाच्या नेहा धुपियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने करियरबाबत आणि त्याच्या आजवरच्या प्रवासाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.

2010 मध्ये आलेल्या दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित 'लव्ह, सेक्स और धोखा' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने पदार्पण केले होते. याच सिनेमात त्याचा एक न्यूड सीन सुद्धा होता. त्याबाबतची आठवण सांगताना ह्या सीन बाबत घरच्यांची प्रतिक्रिया काय होती हे राजकुमारने सांगितले आहे. तो म्हणाला, ''चित्रीकरण सुरु झाल्या नंतर दोन च दिवसात मला दिबाकरने न्यूड सीनबाबत कल्पना दिली. सुरवातीला मला काय रिऍक्ट व्हावे हे कळत नव्हते. पण हा माझ्या कामाचाच एक भाग आहे असा विचार केल्यानंतर मी होकार दिला. पण चित्रीकरणा आधी ही गोष्ट पालकांना सांगितली पाहिजे, असं मला वाटलं. त्यांना कसं सांगायचं याचं मला प्रचंड दडपण आलं. चित्रपट मिळाला असल्या कारणाने ते खूप खुश होते. पण या सीनबाबत ऐकल्यावर त्यांना धक्का बसला. पण नंतर त्यांनी एकदम समजूतदारपणे याला संमती दिली." (हेही वाचा. 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटात आयुष्मान खुराना सोबत रोमांन्स करताना दिसणार राजकुमार राव?)

'मेड इन चायना' मधील राजकुमाराच्या कामाची जरी प्रशंसा होत असली तरीही सिनेमाने म्हणावी तशी कमाई केलेली नाहीये. या सिनेमात त्याच्यासोबत परेश रावल, मौनी रॉय, बोमन इराणी हे कलाकार सहाय्यक भूमिकेत आहेत.