Rakhi Sawant (Photo Credits-Instagram)

राखी सावंत (Rakhi sawant) ही नेहमीच चर्चेत असल्याचे दिसून येते. त्यामागी कारण म्हणजे राखी मीडियासमोर किंवा सोशल मीडियात करत असलेल्या मनोरंजनासह ते तिच्या खासगी आयुष्यामुळे. गेल्या काही काळापासून राखी सावंत हिच्या लग्नाबद्दलच्या काही स्टोरीज सुद्धा समोर आल्या आहेत. तर बिग बॉसच्या घरात सुद्धा जेव्हा राखीने एन्ट्री केली त्यावेळी ही राखीने नवऱ्यासह तिच्या लग्नाबद्दल बोलून दाखवले. मात्र अद्याप राखी हिच्या नवऱ्याचा एकही फोटो अद्याप समोर आलेला नाही. अशातच आता राखीने आपला नवरा रितेश संदर्भात एक मोठा खुलासा केला आहे.

राखी सावंत हिने कॅन्सर सोबत लढणाऱ्या आईची शपथ घेत असे म्हटले की, खरंच रितेश हा तिचा नवरा आहे. मात्र पुढे तिने असे म्हटले की, माहिती नाही की तिचे लग्न अखेर कोणत्या वळणाने जात आहे. खरंतर बहुतांश लोक असे मानतात की लग्नाची गोष्ट ही एक फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. तर रेडिओ होस्ट सिद्धार्थ कन्नन सोबत झालेल्या एका मुलाखतीत राखीला जेव्हा रितेश संदर्भातील प्रश्न विचारला असता तेव्हा तिने माझ्या आईपेक्षा मोठं कोणीही नाही असे म्हटले होते. मी खोटं बोलत नाही आहे. मी आईची शपथ घेऊन सांगते माझा नवरा असून मी लग्न ही केले आहे. मात्र तो भारतात नाही.(कोविड-19 च्या भीतीपोटी Rakhi Sawant ने PPE किट घालून केली भाजी खरेदी; पहा मजेशीर Videos)

दरम्यान, राखीने आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल काही शंका सुद्धा उपस्थितीत केल्या आहेत. तिने म्हटले की, मला माहिती नाही आमचे नाते कोणत्या वळणावर जात आहे. तसेच मला नाही माहिती मी कोणत्या स्टेजवर आहे. लग्नाच्या स्टेजवर आहे की नाही. तसेच लॉकडाऊन सुद्धा लागू करण्यात आला आहे. मला नाही माहिती मी माझ्या नवऱ्यासोबत राहू शकते की नाही. घटस्फोट होईल की नाही. कारण तो कॅनडा मध्ये असून तेथे अद्याप विजा सुरु झालेला नाही.(Rakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार)

तसेच राखी हिने तिच्या कामाबद्दल सांगताना असे म्हटले की, तिला काही रिअॅलिटी शो च्या ऑफर्स सुद्धा आल्या आहेत. त्यांना असे वाटते की, मी आणि रितेश आम्ही एकत्रित सहभागी व्हावे. मात्र मला माहिती नाही तो यासाठी तयार होईल की नाही. माझी आई ठिक झाल्यानंतर आम्ही पुढील प्लॅन एकत्रित बसून ठरवू असे ही राखीने म्हटले.