Rakhi Sawant (Photo Credits: Instagram)

Rakhi Sawant Funny Videos: टीव्ही शोज, सिनेमे यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री राखी सावंत कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी राखी तिच्या मजेशीर अंदाजाने चाहत्यांना खिळवून ठेवते. आता तिचे नवे व्हिडिओज समोर आले आहेत. हे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच हसवतील. देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राखी चक्क पीपीई किट घालून घराबाहेर पडली आहे. (IPL वरुन भडकली राखी सावंत, मुंबईत लोकांचा मृत्यू होतोय तरीही येथे आयपीएल खेळवली जातेय)

भाजी खरेदी कोरोना संसर्गापासून बचाव म्हणून राखी सावंत पीपीई कीट घालून भाजी खरेदी करताना दिसत आहे. खुद्द राखीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून याची प्रचंड चर्चा आहे. पीपीई कीट घातलेल्या राखी सावंतचा मजेशीर अंदाज या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल.

पहा व्हिडिओज:

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

त्यानंतर राखीने मीडिया फोटोग्राफर्स सोबत गप्पा मारल्या. आपल्या कॉमिक अंदाजात तिने कोविड-19 नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला आहे.

या संदेशात राखी म्हणते, बाहेर कुठेही जाताना नेहमी मास्क आणि पीपीई किट घाला. कुटुंबाची काळजी घ्या. देवावर विश्वास ठेवा आणि या कठीण काळात तरुन जाण्यासाठी प्रार्थना करा. तसंच सलमान खानचा राधे सिनेमा पाहण्याचेही तिने आवाहन केले. दरम्यान, काही दिवासंपूर्वीच राखीची आई जया भेदा यांची कॅन्सर सर्जरी यशस्वीरीत्या पार पडली. यात तिला सलमान खानने मदत केल्याचेही तिने यापूर्वी सांगितले होते.