IPL वरुन भडकली राखी सावंत, मुंबईत लोकांचा मृत्यू होतोय तरीही येथे आयपीएल खेळवली जातेय
राखी सावंत (Photo Credit: Instagram)

बिग बॉस फेम अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. मात्र सध्या राखी काही गोष्टींमुळे चिंतेत असल्याचे दिसून आले आहे. जसे देशभरात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक तुफान वाढत असे त्यामुळे राखी त्रस्त आहे. त्याचसोबत या परिस्थिती संदर्भात राखीने संताप सुद्धा व्यक्त केला आहे. सर्वांना माहिती आहे की, सध्या आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. तर 2021 मध्ये जरी कोरोनाची परिस्थिती असली तरीही आयपीएलचे सामने खेळवले जात आहेत. काही सामने मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर खेळवले जात आहेत. याच गोष्टीवर आता राखी संतप्त झाली आहे. जेव्हा मीडियाने राखीला या संदर्भात विचारले असता तेव्हा तिने तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

राखी सावंत हिला विचारले गेले की, आयपीएल ती फॉलो करत आहे की नाही? यावर राखी भडकली आणि म्हटले की, येथे मुंबईत लोकांचा मृत्यू होतोय. आमचे आयुष्य झंड झाले आहे आणि लोक येथे आयपीएल खेळत आहेत. आम्ही चोरुनचोरुन गाड्यांमधून फिरतोय आणि लोक आयपीएल खेळतायत. पुढे राखीने म्हटले की, मी तुम्हाला सांगते की मुंबईत लोक आहेच नाहीत. मुंबईत लॉकडाऊन असल्याने ते सुट्टी घालवण्यासाठी बाहेर गेले आहेत. मी फक्त येथे एकटी आहे. तुम्हाला दुसरं कोणीही मिळणार नाही. कारण सगळेच मुंबई सोडून गेले आहेत. सर्वजण मजा करत आहेत. मालदीव येथे जाऊन तेथील पाण्यात कोरोनाचे विसर्जन करुन येणार आहेत.(Dostana 2 मधून कार्तिक आर्यन ला डच्चू दिल्यानंतर दिग्दर्शक करण जौहरने आता इन्स्टाग्रामवरही अभिनेत्याला केले अनफॉलो)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

दरम्यान, राखी हिने आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवरुन आपल्या आईच्या प्रकृतीचे सुद्धा अपडेट्स देत असते. तिने एका व्हिडिओत असे म्हटले आहे की, ती खुप चिंतेत आहे की तिला आईला रुग्णालयात दाखल करायचे आहे.उद्या सकाळी तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जाणार आहे. त्याचसोबत कोरोना कधी जाणार याची सुद्धा चिंता राखीला सतावत आहे. याआधी राखीचा समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ती लोकांना मास्क घालण्याचे अपील करत होती.