Dostana 2 मधून कार्तिक आर्यन ला डच्चू दिल्यानंतर दिग्दर्शक करण जौहरने आता इन्स्टाग्रामवरही अभिनेत्याला केले अनफॉलो
Karan Johar and Kartik Aaryan (Photo Credits: FB/Instagram)

तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेला बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याला मोठे ग्रहण लागले आहे. धर्मा प्रोडक्शन (Dharma Productions) प्रस्तुत 'दोस्ताना 2' (Dostana 2) या चित्रपटातून कार्तिक आर्यनची हकालपट्टी केल्याची बातमी वा-यासारखी सगळीकडे पसरली. स्वत: धर्मा प्रोडक्शनने आपल्या अधिकृत पेजवर याबाबत माहिती दिली. त्यानंतर करण जौहर (Karan Johar) आणि कार्तिक आर्यन यांच्यात नेमकं काय घडलं? अशा अनेक चर्चा रंगल्या. त्यातच आता आणखी एक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे करण जौहरने कार्तिक आर्यनला इन्स्टाग्रामवरुन (Instagram) अनफॉलो केले आहे.

करणने कार्तिकला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केल्यानंतर या दोघांमध्ये नक्कीच मोठी फूट पडल्याचे उघड उघड दिसत आहे. मात्र कार्तिक अजूनही करण जौहरला फॉलो करत आहे. सूत्रांकडून अशी माहिती मिळाली होती, की कार्तिकला दोस्ताना 2 ची अर्धी स्क्रिप्ट आवडली नव्हती. तसेच तो चित्रपट निर्मात्यांना पुढील डेट्स देत नव्हता. म्हणून कार्तिकला डच्चू देत त्याच्या जागी दुस-या अभिनेत्याला घेण्यात येणार आहे.हेदेखील वाचा- Kartik Aaryan आणि Karan Johar यांच्यातील वादात Kangana Ranaut ची उडी; पहा काय म्हणाली

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकने ‘दोस्ताना 2’ सिनेमाचं चित्रीकरण सुरु केले होतं. 20 दिवसांचे चित्रीकरण झाल्यानंतर त्याने पुढील डेट्स देण्यास नकार दिला होता. सध्या कार्तिककडे अनेक प्रोजक्ट्स असल्यामुळे तो कामात व्यग्र आहे.

या संदर्भात काल धर्मा प्रोडक्शनने सोशल मिडियावर एक नोट जारी केले होते. ज्यात

"व्यावसायिक कारणास्तव आम्ही दोस्ताना-2 या सिनेमाची रिकास्टिंग करणार आहोत. अधिकृत घोषणेसाठी प्रतिक्षा करा." असं सांगण्यात आलंय.