Rakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार
राखी सावंत हिने मानले सलमानचे आभार (Photo Credits- Instagram)

टीव्ही ते बॉलिवूड पर्यंत आपल्या अभिनयासह डान्सच्या माध्यमातून सर्वांवर छाप पाडणारी राखी सावंत  (Rakhi Sawant) आणि तिचा परिवार सध्या एका समस्येशी सामना करत आहे. सर्वांनाच माहिती आहे की, राखी सावंत हिची आई जया भेदा (Jaya Bheda) यांना कॅन्सरचा आजार झालाा आहे. आज अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत असे म्हटले की, आज माझ्या आईचे कॅन्सरवर ऑपरेशन केले जाणार आहे. त्यामध्ये तिचे ट्युमर काढले जाणार असून आई त्या आजारापासून मुक्त होणार आहे.

राखीने आपली आई जया हिच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करत म्हटले की, तिला ऑपरेशन करण्यासाठी घेऊन जात आहे. व्हिडिओ मध्ये सलमान खान याचे सुद्धा आभार मानले आहेत. राखीने म्हटले की, सलमानने माझी आर्थिकच नव्हे तर उत्तम डॉक्टरांच्या माध्यमातून आईच्या कॅन्सर उपचारासाठी देखभाल केली त्यासाठी मी नेहमीच त्याची ऋणी राहीन.(IPL वरुन भडकली राखी सावंत, मुंबईत लोकांचा मृत्यू होतोय तरीही येथे आयपीएल खेळवली जातेय)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

त्याचसोबत व्हिडिओमध्ये जया भेदा सुद्धा सलमान खान याचे आभार मानताना दिसून आल्या आणि त्यांनी त्याला आशीर्वाद सुद्धा दिले. राखीने व्हिडिओ पोस्ट करत म्हटले की, धन्यवाद देवा आणि सलमान खान. या पोस्टमध्ये तिने विकास गुप्ता आणि कविता कौशिकचे सुद्धा धन्यवाद म्हटले आहे.

दरम्यान, राखी सावंत जेव्हा बिग बॉसच्या घरात आली होती तेव्हा समजले की तिच्या आईला कॅन्सर झाला आहे. तेव्हा तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या बद्दल जेव्हा राखीला कळले तेव्हा ती खुप भावूक झाली आणि घरातून बाहेर कधी पडतेय असे तिला झाले होते. शो मध्ये राखी आणि निक्की तंबोली यांच्यामध्ये जोरदार वाद झाले ते नेहमीच चर्चेत असायचे.