Raj Kundra ने अटकेपासून बचाव करण्यासाठी पोलिसांना दिली होती 25 लाखांची लाच, यश ठाकूर याचा दावा
Raj Kundra (Photo Credits: Instagram)

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी अश्लील फिल्म प्रकरणी अटक केली आहे. त्यानुसार त्याला येत्या 23 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र आता पोलिसांवरच आरोप लावण्यास सुरुवात झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणी फरार असलेला आरोपी यश ठाकूर याने दावा केला आहे की, राज कुंद्रा याने पोलिसांच्या अटकेपासून बचाव करण्यासाठी त्याने 25 लाख रुपयांची लाच दिली होती. याच बद्दल यश ठाकूर याने म्हटले की, त्याच्याकडून सुद्धा पोलिसांनी लाच मागितली होती.

नवभारत टाइम्समध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार, यश ठाकूर याने या प्रकरणी महाराष्ट्र अँन्टी करप्शन ब्युरो यांना ईमेल लिहून पाठवत तक्रार केली होती. त्याने दावा केला की, गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्यांनी राज कुंद्रा याच्याकडून 25 लाख रुपये लाच घेतली आहे. त्यानंतर ACB ने ईमेल मुंबई पोलीस आयुक्तांना फॉरवर्ड केला होता. सध्या यश पॉर्न फिल्म मधील फरार आरोपी असल्याचे सांगितले जात आहे.(Sex Video Shoot च्या अॅपवर Raj Kundra कडून अपलोड केले जायचे व्हिडिओ, प्रतिदिनी व्हायची लाखोंची कमाई)

Tweet:

अश्लील फिल्म प्रकरणी राज कुंद्रा आणि त्याचा आयटी हेड रायन थार्पसह 11 लोकांना अटक केली आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात पहिली अटक झाली होती.