बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) आणि अमेरिकन गायक निक जोनस(NickJonas) आज कॅथलिक पद्धतीने विवाह करणार आहेत. तसेच राजस्थानच्या जोधपूरमधील उमेद भवन येथे हा लग्नसोहळा पार पडणार आहे.
निकयांका आज ख्रिस्ती धर्म (Catholic) पद्धतीने लग्नबंधनात अडकणार असून उद्या 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीने पुन्हा लग्न करणार आहेत. आजच्या लग्नसोहळ्यासाठी सफेद रंगाचा गाऊन प्रियांका घालणार असून निक फॉर्मल ड्रेसमध्ये दिसून येणार आहे. या सोहळ्यादरम्यान प्रियांका आणि निकच्या घरातील एकमेकांबद्दलचे मनोगत व्यक्त करणार आहेत. तसेच गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून गायिका मानसी स्कॉट गायन करणार आहे. या शाही लग्न सोहळ्यासाठी 100 माणसे उपस्थित राहणार आहेत. मात्र या दोघांसाठी महाराज आणि महाराणी पद्धतीचे गोड पदार्थांचा मेनू ठेवण्यात आला आहे.
प्रियांका आणि निकच्या लग्नासाठी अनेक दिग्गज मंडळींनी या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली आहे. तर अंबानी परिवार ही जोधपूरमध्ये दाखल झाले असून बॉलिवूड कलाकारांनीची उपस्थिती पाहायला मिळणार आहे.