प्रियंका-निकने तब्बल 2.5 मिलिअन डॉलर्सना विकले लग्नाच्या फोटोंचे हक्क ?
निक आणि प्रियंका (Photo Credits: Twitter)

प्रियंका आणि निक यांची जोडी जितकी भारतात लोकप्रिय आहे तितकीच तिला आंतरराष्ट्रीय लेव्हलवर देखील प्रसिद्धी मिळाली आहे. आता तर या दोघांच्या लग्नामुळे ही जोडी सतत प्रकाशझोतात असते. या दोघांच्या लग्नाचे प्रत्येक अपडेट्स मिडीयासाठी बातमी बनले आहेत. साखरपुडा, बॅचलर पार्टी, लग्नस्थळ, कपडे, लग्नात येणारे पाहुणे अशा प्रत्येक गोष्टी मिडीयाने मोठ्या चवीने कव्हर केल्या. शेवटी आता चर्चा रंगत आहे ती या लग्नाच्या फोटोंचे ऑफिशिअल हक्क मिळवण्याच्या चढाओढीचे. प्रियंका-निकच्या लग्नाचा पहिला फोटो कोण छापणार यासाठी आंतरराष्ट्रीय मॅगझिन्सची चढाओढ सुरू आहे. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंकाने या लग्नाच्या फोटोंचे हक्क तब्बल 2.5 मिलिअन डॉलर्सना विकले आहेत.

राजस्थानमधील जोधपुर येथे, 2 डिसेंबरला प्रियंका-निकचे लग्न होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. फक्त मोजक्याच 200 लोकांच्या सानिध्यात हा विवाहसोहळा पार पडणार आहे. मात्र हे दोघेही आंतरराष्ट्रीय स्टार्स असल्याने या लग्नाचे मार्केटिंग आणि पब्लिसिटी जोरदार होणार आहे. त्यासाठी या लग्नाच्या फोटोंंबाबत माध्यमांमध्ये अक्षरशः बोली लावण्यात आली. शेवटी प्रियंकाने या फोटोंचे हक्क एका आंतरराष्ट्रीय मासिक विकून टाकले आहेत. या मासिकाचे नाव अजूनतरी गुलदस्त्यात असून लवकरच याबाबतची माहिती प्रियंका आणि निककडून मिळेल.

याधीही सोनम कपूरच्या लग्नाचे फोटो 'वोग' मासिकामध्ये सर्वप्रथम छापण्यात आले होते. त्यावेळी या फोटोंना मिळालेली प्रसिद्धी पाहता, आता प्रियंका आणि निकच्या लग्नाच्या फोटोंनाही आंतरराष्ट्रीय दर्जावर लोकप्रियता मिळेल यात शंका नाही .