फोटोज : ईशा अंबानी, परिणीतीसोबत धुमधडाक्यात साजरी झाली प्रियंकाची बॅचलर पार्टी
प्रियंका चोप्रा (Photo Credits : Instagram)

सध्या सर्वत्र फक्त तीनच लग्नांची चर्चा रंगली आहे. दीपिका-रणवीर, अंबानी कन्या आणि प्रियंका-निक. काल रणवीरच्या हळदीचा फोटो व्हायरल झाला, तर ईशा अंबानीची लग्नपत्रिका लोकांनी पहिली. अशातच आता सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे ती प्रियंका चोप्राच्या बॅचलर पार्टीची. 2 डिसेंबरला प्रियंका आणि निक जोधपुर येथे विवाहबंधनात अडकत आहेत. त्यामुळे आता यांच्या विवाहाची तयारी आणि विधी सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतीच प्रियंकाने तिची बॅचलर पार्टी आयोजित केली होती.

 

View this post on Instagram

 

Red, white and Bride!!! #Bachelorette

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

 

View this post on Instagram

 

Featherweight Champion of the world... #Bachelorette #FauxNotFur @georgeschakraofficial

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

सध्या लग्न होणाऱ्या प्रत्येक मुला-मुलीसाठी त्यांची बॅचलर पार्टी ही फार महत्वाची गोष्ट झाली आहे. लग्नापूर्वी आपल्या सर्व मित्रांना भेटून सिंगल असतानाची केली गेलेली ही शेवटची पार्टी म्हणून याचे महत्वही तितकेच आहे. प्रियंकानेही तिचे हॉलिवूड फ्रेन्ड्स, चुलत बहीण परिणीती चोप्रा, ईशा अंबानीसोबत बॅचलरेट पार्टी केली. या सेलिब्रेशनचे फोटो परी व प्रियंकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

Red, White and Bride! #PCsBachelorette

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

या पार्टीमध्ये प्रियंकाच्या फ्रेंड्सनी लाल रंगाच्या थीमचे कपडे घातले होते, तर या सर्वांमध्ये उठून दिसावी म्हणून होणाऱ्या नवरीने म्हणजेच प्रियंकाने व्हाईट कलरचा ड्रेस परिधान केला होता. सध्या या ड्रेसची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण अतिशय वेगळ्या स्टाईलच्या या नी-लेंथ व्हाईट ड्रेससोबत प्रियंकाने फेदर जॅकेट कॅरी केले.

 

View this post on Instagram

 

Lights. Camera. Bachelorette!@hot.hair.balloon @adrika.shetty @tashhmahal @thediamantinaduchess

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

यापूर्वी प्रियंकाची ब्राईडल शॉवर पार्टीही अशीच धुमधडाक्यात साजरी झाली होती. या पार्टीमध्ये प्रियंकाचा आपल्या सासुसोबतचा डान्स अतिशय व्हायरल झाला होता. प्रियंका आणि निक हे भारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही पद्धतीने लग्न करणार आहेत. प्राप्त माहितीनुसार, 30 नोव्हेंबरपासून प्रियंकाच्या लग्नाचे विधी सुरू होतील.