सायनाच्या बायोपिकमधला परिणितीचा पहिला लुक केला खुद्द सायनाने शेयर
parineeti chopra/(photo credit: twitter)

ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका करणाऱ्या परिणितीचा पहिला लुक खुद्द सायनाने नुकताच सोशल मीडियावर शेयर केला आहे. हा चित्रपटाचं चित्रीकरणाला थोड्याच दिवसांत सुरुवात असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सायनाने टाकलेल्या पोस्टमध्ये तिने अख्ख्या टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत.

सायनाच्या बायोपिकसाठी आधी श्रद्धा कपूरची वर्णी लागली होती. मागच्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात चित्रीकरणही सुरु झालं होतं. पण तारखांच्या अडचणीमुळे तिला अखेरीस ह्या भूमिकेवर पाणी सोडावं लागलं आणि मार्चमध्ये त्या भूमिकेसाठी परिणितीची निवड करण्यात आली. (हेही वाचा,  अभिनेत्री सारा अली खानच्या या कृत्यामुळे आई अमृता सिंग ला लपवावे लागले आपले तोंड, Watch Video)

 

चित्रपटाचं दिग्दर्शन 'स्टॅनली का डब्बा' चे दिग्दर्शक तसेच 'तारे जमीं पर'चे लेखक अमोल गुप्ते करणार आहेत. परिणितीसाठी हा चित्रपट खूप महत्वाचा आहे. कारण तिचे गेले काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तितकीशी कमाल करू शकले नाहीत. 'नमस्ते इंग्लंड' आणि 'जबरिया जोडी' ह्या चित्रपटांची प्रेक्षकांनी दखलही घेतली नाही. तर 'गोलमाल अगेन' आणि 'केसरी' हे चित्रपट चालले, परंतु परिणिती त्यात सहाय्यक भुमिकेत होती. त्यामुळेच हा चित्रपट तिच्या करिअरसाठी महत्वाचा ठरू शकतो.