Paras Nayal Passes Away: सिनेसृष्टीतील प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर पारस नयाल याचे निधन; टायगर श्रॉफ, आयशा श्रॉफ यांनी वाहली श्रद्धांजली
Paras Nayal (Photo Credits: Instagram)

वर्ष 2020 हे सर्वांसाठी संकटाचे ठरत चालले आहे. यावर्षी संपूर्ण जगासाठी सर्वाधिक धोकादायक ठरलेल्या कोरोना विषाणूने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. तसेच हे वर्ष सिनेसृष्टीतील अनेकांसाठी नुकसानदायक ठरले आहे. दरम्यान, यावर्षी अनेक छोट्या मोठ्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. यातच सिनेसृष्टीतील प्रसिद्ध फिटनेस ट्रेनस पारस नयाल (Paras Nayal) याचे 6 ऑगस्ट रोजी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पारस नयाल याच्या निधनाची बातमी समजताच सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. यानंतर बॉलिवूड अभिनेते टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि त्याची आई आयशा श्रॉफ (Ayesha Shroff) यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारस नयाल हा श्रॉफ कुटुंबियांच्या अधिक जवळ होते. तसेच कृष्णा श्रॉफ यांचे बॉयफ्रेंड असल्याची माहिती समोर आली आहे. पारस हे एमएमए मॅट्रिक्स (MMA Matrix) येथे फिटनेस ट्रेनर होते. पारस हा गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यांपासून एका ऑटो इम्यून डिजीज या आजाराने ग्रस्त होता. हा आजार थेट शरिरावर हल्ला करतो. या आजाराशी लढत पारस याने पराभव न स्वीकारता फिटनेसच्या जगात मोठी प्रसिद्धी मिळवत गेले. मात्र, गुरवारी त्यांची प्राणज्योत मावळली आहे. पारस यांच्याजवळ असलेल्या गुणांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळवली. तसेच बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडली. एमएमए मॅट्रिक्सच्या इंस्टाग्राम पेजवरून पारस यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. हे देखील वाचा- Bhojpuri Actress Anupama Pathak Suicide Case: भोजपूरी अभिनेत्री अनुपमा पाठक आत्महत्याप्रकरणी एका व्यक्ती आणि कंपनीच्याविरोधात कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल

एमएमए मॅट्रिक्स इंस्टाग्राम पोस्ट-

श्रॉफ कुटुंबियाकडून श्रद्धांजली-

एमएमए मॅट्रिक्सच्या इंस्टाग्राम पोस्टवर टाइगर श्रॉफने रेस्ट इन पॉवर ब्रदर तर, त्याची आई आयशा यांनी रेस्ट इन पीस वॉरियर अशी कमेन्ट केली आहे. दुसरीकडे कृष्णा श्रॉफ यांनी पारस याच्या निधनावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.