Bhojpuri Actress Anupama Pathak Suicide Case: भोजपूरी अभिनेत्री अनुपमा पाठक आत्महत्याप्रकरणी एका व्यक्ती आणि कंपनीच्याविरोधात कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल
Anupama Pathak (Photo Credits: Instagram)

भोजपरी अभिनेत्री आणि टी.व्ही मालिकांमध्ये काम करणारी अनुपमा पाठक (Anupama Pathak) हिने रविवारी आत्महत्या केली आहे. याप्रकरणाची चौकशी करत असताना दहिसर येथील काशीमीरा (Kashimira Police) पोलिसांना अनुपमा पाठक यांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे. ज्यात तिने आपल्या मृत्यूचे कारण लिहले आहे. त्यानुसार, एक व्यक्ती आणि एका कंपनीविरोधात कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अनुपमा पाठने फेसबूक लाईव्ह देखील केले होते. एका व्यक्तीच्या आणि एका कंपनीने त्यांची फसवणूक केल्याची त्यावेळी तिने सांगितले होते. अनुपमा पाठकच्या आत्महत्येची माहिती समजताच भोजपूरी सिनेसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.

अनुपमा मुंबईच्या दहिसर चौकीवर असलेल्या ठाकूर मॉलजवळील एमएमआरडीएच्या इमारतीत भाड्याच्या घरात राहत होती. मात्र, रविवारी आत्महत्या करण्यापूर्वी अनुपमा पाठकने फेसबूक लाईव्हच्या लाईव्ह केले होते. त्यावेळी ती म्हणाले होती की, मनीष झा नावाच्या व्यक्तीने मे महिन्यात लॉकडाऊन असताना आपली दुचाकी घेतली होती. त्यावेळी ती गावी होती. मात्र, ज्यावेळी ती मुंबईत परतले तेव्हा मनीषने तिची दुचाकी परत देण्यास नकार दिला. तर, एका प्रॉडक्शन कंपनीत तिने 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. हे पैसे व्याजासहित परत येणार होते. मात्र, तिला हे पैसे मिळाले नसून तिची फसवणूक झाली आहे, असे दोन कारणे तिने सांगितले आहेत. हे देखील वाचा- टीव्ही अभिनेता Sameer Sharma चे निधन, मुंबईतील राहत्या घरात आढळला मृतदेह, आत्महत्या केल्याचा संशय

एएनआये ट्वीट-

याबाबत काशिमीरा पोलिसांनी अधिक चौकशी सुरु केली आहे. सिनेसृष्टीतील कलाकारांच्या आत्महत्येने सर्वांनाच हादरून सोडले आहे. याआधी कुशल पंजाबी, सेजल शर्मा, सुशांत सिंह राजपूत, समीर शर्मा, आणि मनमीत ग्रेवाल, यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. सिनेसृष्टीतील कलाकारांच्या वाढत्या आत्महत्येच्या संख्येने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.