Pallavi Joshi (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबई, 10 जुलै 2019:  डिजिटल पेमेंट  (Digital Payment) ही संकल्पना जितकी फायदेशीर आहे तितकेच सुरक्षेच्या कारणास्तव तिचे दुष्परिणामही सहन करावे लागतात, अलीकडे याचा अनुभव मराठी अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi)  हिला सुद्धा आला आहे. मागील आठवड्यात तिच्या क्रेडिट कार्ड (Credit Card)  वरून अवैध पद्धतीने तब्बल  12,000 रुपये वापरण्यात आले होते. याविषयी पल्लवीने वर्सोवा पोलिसांकडे (Versova Police Station)  तक्रार नोंदवली असून पोलिसांच्या तपासात, या अज्ञातांनी तिचे अकाउंट डिटेल्स आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरून युरोप  (Europe) मधून ही अफरातफर केल्याचे समोर आले आहे.

पल्लवी जोशी हिने हिंदुस्तान टाइम्स ला दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 5 जुलै ला घडला असून त्यावेळी क्रेडिट कार्ड हे तिच्याकडेच होते. अचानक फोनवर पाच सह मॅसेज आले म्हणून तपासल्यास यामध्ये 12,000 इतकी रक्कम युरो च्या स्वरूपात वापरल्यात आल्याचे दिसून आले, ज्यावर तिने बँकेला कॉल करून माहिती दिली तसेच कार्ड तातडीने ब्लॉक सुद्धा केले आहे.पहा नेट बँकिंगद्वारा कसं अप्लाय कराल नवं कार्ड 

दरम्यान, पोलिसांच्या तपासानुसार युरोपमधील काही जणांनी टॅक्सीचे भाडे भरण्यासाठी या कार्डाचा वापर केलेल्याचे समजत आहे. यामध्ये प्राथमिक चौकशीला सुरवात केली असून अज्ञात आरोपीवर आयपीसी व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बदगुजर यांनी सांगितले आहे.