हार्दिक पांड्या याची पत्नी नताशा हिचा ग्लॅमरस अवतार पाहून व्हाल थक्क, कॅटवॉक करतानाचा Video व्हायरल
Nataša Stanković (Photo Credits-Instagram)

भारतीय संघातील ऑलराउंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याची पत्नी नताशा स्टेनकोविक (Nataša Stanković) सोशल मीडिया खुप अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असल्याने त्याला लाखोंच्या संख्येने लाइक्स असतात. अशातच आता नताशा हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियात खुप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नताशा कॅटवॉक करताना दिसून येत आहे. नताशा हिने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवरील अकाउंटवर पोस्ट केला आहे.(Weight Loss Tips: अभिनेत्री समीरा रेड्डी ने शेअर केल्या आहेत वजन कमी करण्यासाठी काही खास टिप्स, तुम्ही ही घेऊ शकता Inspiration)

नताशाने शेअर केलेल्या व्हिडिओवर लोकांकडून खुप प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. हार्दिक पांड्या याने सुद्धा कमेंट बॉक्समध्ये हार्ट आणि आग असणारा इमोजी पोस्ट केला आहे. तसेच कृणाल पांड्याने सुद्धा तिच्या या व्हिडिओवर कमेंट केली आहे. हार्दिक सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी मुंबईत क्वारंटाइन आहे. नताशा हिचा हा व्हिडिओ मुंबईतील हॉटेलमधील दिसून येत आहे.(Koffee With Karan मध्ये विक्की कौशल आणि कतरिना कैफ करणार आपल्या नात्याचा खुलासा- Reports)

दरम्यान, हार्दिक पांड्या सुद्धा सोशल मीडियात खुप अॅक्टिव्ह असतो. हार्दिक याने नुकताच आपल्या इंस्टाग्रामवरील स्टोरीत वर्कआउट नंतरच सेल्फी फोटो शेअर केला होता. तर हार्दिकला इंग्लंड दौऱ्यासाठी टेस्ट स्क्वॉडमध्ये सहभागी करुन घेण्यात आले नव्हते. पण श्रीलंकेच्या विरोधात 3 वनडे आणि 3टी 20 सामन्यांच्या सीरिजसाठी भारतीय संघात त्याला घेण्यात आले होते.