Nagraj Manjule New Movie: प्रत्येकाला वाटतं आपण एकातरी चित्रपटात काम करावं. रुपेरी पडद्यावर काम करण्याची संधी घेवून आले आहेत. दिग्दर्शक नागराज मंजूळे (Nagraj Manjule) यांनी नुकतच सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर केली आहे. त्या त्यांनी आगामी चित्रपटासाठी उत्सुक तरुणांना संधी दिली जाईल असा पोस्ट शेअर केला आहे. नागराज मंजूळे हे एक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच मनोरंजन करतात. त्यांचा सोबत काम करयाचं म्हणजे बड्या बड्या कलाकारचं देखील स्वप्न आहे.
सैराट, नाळ, झुंड, फॅंड्री या सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मीतीची कामे केली आहे. आजवरची अनेक चित्रपट ही ब्लॉकबास्टर ठरली आहेत. रिंकू राजगुरू, आकाश ठोसर ते ज्येष्ठ अभिनेते अमिताब बच्चन यांनी देखील त्यांच्या चित्रपटात काम केलं.
हे आगामी चित्रपट खाशाबाची तयारी करत आहे. त्या चित्रपटात नवोदित कलाकारांना काम करण्यासाठी अटी घातल्या आहेत. *जिओ स्टुडिओज आणि आटपाट निर्मित* खाशाबा. चित्रपट ऑडिशन घेण्यात येईल. दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे.. फक्त मुलांसाठी.. वयोगट - 7 ते 25 वर्षे.. मराठी भाषा तसंच माती आणि मॅटवरची कुस्ती येणं आवश्यक.
पाच फोटो ( त्यातील 3 फोटो शरीरयष्टी दाखवणारे).. 30 सेकंदाचा कुस्ती खेळताना व्हिडीओ... 30 सेकंदाचा स्वतःची थोडक्यात माहिती सांगणारा व्हिडीओ आणि फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 20 जुलै.. अशी पोस्ट नागराज मंजुळेंनी केलीय.
नामाकिंत पैलवान खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. नागराज मंजूळे यात दिग्दर्शन आणि निर्मातीचे काम करणार आहे. कुस्ती ह्या खेळात ऑलम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा ह्यांच्या जीवनावर आधारलेला चित्रपट असणार आहे. प्रेक्षकांना ही या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.