Naagin 3 : लवकरच नागिन 3 होणार बंद; 'हा' नवीन शो घेणार जागा
नागिन 3 (Photo Credit: Colors TV/ Episode Stills)

नागिन 3 (Naagin 3), सध्या छोट्या पडद्यावर चालत असलेला एक लोकप्रिय शो. नागिनच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. त्यानंतर आता नागिन 3 नेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र नागिनच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. लवकरच नागिन 3 प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एका इंग्रजी वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार नागिन 3 फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात बंद होणार आहेत. त्याच्याजागी कलर्स वाहिनीचाच अजून एक लोकप्रिय शो, कवच 2 येणार आहे.

नागिन 3 चा शेवटचा भाग 12 फेब्रुवारी रोजी चित्रित केला जाणार आहे. त्यानंतर शेवटच्या आठवड्यात हा भाग प्रदर्शित होईल. त्याच्या जागी विवेक दहियाची कवच 2 सुरु होईल. नागिन 3 मधील कलाकार, नवीन ट्वीस्ट, वेगाने पुढे जाणारे कथानक यांमुळे या शोने लोकांच्या मनात घर निर्माण केले होते. मात्र आता हा शो बंद होणार असल्याने प्रेक्षकांची निराशा होणार आहे.

2015 साली 'नागिन' मालिकाचा पहिला भाग छोट्या पडद्यावर आला, त्यानंतर या मालिकेने 'नागिन 3'चा टप्पा गाठला. अनीता हंसनदानी, सुरभी ज्योती, करिश्मा तन्ना हे या तिसऱ्या भागातील कलाकारांनी क्षणार्धात प्रेक्षकांना आकर्षित करून घेतले होते. नागमणी सुरक्षित ठेवण्यासाठीची लढाई नागिन शोमध्ये दाखवण्यात आली होती.