Smile Please Teaser: मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर या फ्रेश जोडीचा 'स्माईल प्लिज' सिनेमा; 'करण जोहर' कडून टीझर शेअर
Smile Please Teaser (Photo Credits: You Tube)

फॅशन डिझायनर आणि सिनेनिर्माता विक्रम फडणीस (Vikram Phadnis) 'हृद्यांतर' नंतर आता 'स्माईल प्लिज'(Smile Please) हा नवा मराठी सिनेमा रसिकांसाठी घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) या सिनेमाची पहिली झलक शेअर केल्यानंतर सोशल मीडियामध्ये उत्सुकता वाढलेल्या 'स्माईल प्लिज' या सिनेमाचा टीझर बॉलिवूड सिनेनिर्माता, दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) यांच्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर करण्यात आला आहे. मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर या नव्या जोडीची झलक या सिनेमाच्या टीझरमध्ये पहायला मिळते. 'Smile Please' चित्रपटाचे फर्स्ट लूक आऊट

स्माईल प्लिज सिनेमाचा टीझर

'स्माईल प्लिज' या सिनेमात फोटोग्राफी क्षेत्रात चढ-उतार पाहिलेल्या एका फोटोग्राफरच्या भूमिकेत अभिनेत्री मुक्ता बर्वे दिसणार आहे.अवघ्या मिनिटाभराच्या टीझरमध्ये त्याची झलक पहायला मिळते. सोबतच ललिल आणि मुक्तामधील लव्ह स्टोरीमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाबाबत नक्कीच उत्सुकता वाढली असेल.

विक्रम फडणीस दिग्दर्शित या सिनेमामध्ये मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. स्माईल प्लिज हा चित्रपट येत्या 19 जुलै ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.