Video: ‘व्हीआयपी गाढव’ चित्रपटातील गाणे 'गंगाराम आला' प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा भाऊ कदम, शीतल अहिरराव यांचा मोकळाढाकळा डान्स
Bhau Kadam, Sheetal Ahirrao | (Photo Credits-Facebook)

आपल्या विनोदी अभिनयशैलीने घराघरात पोहोचलेला अभिनेता भाऊ कदम (Bhau Kadam) आता ‘व्हीआयपी गाढव’ (VIP Gadhav) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटात भाऊ कदम याच्यासोबत बोल्ड अभिनेत्री शीतल अहिरराव (Sheetal Ahirrao) हिसुद्धा झळकणार आहे. खास बाब म्हणजे भाऊ कदम आणि शीतल अहिरराव यांच्यावर चित्रित झालेले 'गंगाराम आला' (Gangaram Ala Song) हे गाणेही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात भाऊ कदम आणि शीतल अहिरराव हिचा मोकळाढाकळा डान्स पाहायला मिळतो. हा सिनेमा येत्या 13 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भाऊ कदम याने आतापर्यंत अनेक विनोदी कार्यक्रम, नाटके आणि चित्रपटांतून काम केले आहे. तर, शीतल अहिरराव ही ‘H2O कहाणी थेंबाची’‘वॉक तुरु तुरु’, ल’ई भारी पोरी’, ‘इश्काचा किडा’ यांसारख्या म्युझिक अल्बम्समधून आणि चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला आली आहे. ‘जलसा’, ‘मोल, ‘फक्त एकदाच’, ‘होरा’, ‘सलमान सोसायटी’ यांसारख्या चित्रपटातही शितलने काम केले आहे.

भाऊ कदम, शीतल अहिरराव यांच्यासोबतच या चित्रपटात भाऊ कदम, विजय पाटकर, भारत गणेशपुरे यांच्यासह इतर काही कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. विनोदाचे अचूक टायमींग असलेल्या या चित्रपटात अभिनेता, दिग्दर्शक दादा कोंडके स्टाईल विनोदी संवादाचा वर्षाव असणार आहे. तसेच, या सिनेमात द्वयर्थी संवादही असल्याचे समजते. ‘व्हीआयपी गाढव’ चित्रपटासाठी संजय पाटील यांनी दिग्दर्शन केले आहे. (हेही वाचा, भाऊ कदम यांनी मागितली आगरी आणि कोळी समाजाची जाहीर माफी; पाहा काय आहे कारण)

गंगाराम आला गाणे

चर्चा आहे की, 'व्हीआयपी गाढव' सिनेमात भाऊ कदम आणि शीतल अहिरराव यांच्या अभिनयाची जुगलबंदी पहायला मिळणार आहे. या चित्रपटात दोघे पती-पत्नीची भूमिका साकारत आहेत. भाऊ कदम याने यापूर्वी विनोदी सिनेमे आणि भूमिका केल्या आहेत. त्या तुलनेत शीतल अहिरहाव ही मात्र आजवर हलक्याफुलक्या भूमिकांतूनच दिसली आहे. त्यामुळे भाऊ कदम याच्यासोबत तिचे विनोदाचे टायमींग कसे साधले आहे, हे पाहणे रंजक दिसणार आहे. या चित्रपटात शितल एका गावरान बाईची भूमिका साकारत आहे.