चित्रपट ठाकरे (फोटो सौजन्य- यु ट्युब)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट 'ठाकरे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज (12 जानेवारी) चित्रपटाचे निर्मात्यांनी यामधील गाणं 'आया रे ठाकरे'(Aaya Re Thackeray) प्रदर्शित केले आहे. या गाण्यात नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत झळकणार आहे. हे गाणं बाळासाहेब यांची शान आणि त्यांच्या नेतृत्वाला सलाम करणारे आहे.

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. तर संजय राऊत यांनी या बायोपिकची कथा लिहिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसे  (Abhijit Panse) यांनी केले आहे. तर गाण्यातून बाळासाहेबांचा कार्यकाल आणि कणखरणा दाखवण्यात आला आहे. तसेच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पूर्णपणे बाळासाहेबांच्या रुपात दिसून आला आहे. (हेही वाचा- Thackeray Trailer : 'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; बाळासाहेबांची जीवनगाथा लवकरच रुपेरी पडद्यावर (Video)

या चित्रटाच्या गाण्याबद्दल नवाजुद्दीनने सांगितले की, 'चित्रपटातील गाण खूप जबरदस्त आहे. मी हे गाणं शूटींगदरम्यान पूर्णपणे ऐकले होते. परंतु या गाण्याचे फायनल आऊटकम एकदम भारी आहे. मी या बड्या अँथम साँगची अपेक्षा केली नव्हती. बाळासाहेबांची भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न केले आहेत. परंतु या चित्रपटाबाबत आणखी खुलासा आताच करणार नाही' असे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर ट्रेलर पाहून प्रेक्षकांना आता ठाकरे चित्रपट लवकरच सिनेमागृहात पाहण्याची खूप उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या 25 जानेवारी, 2019 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.