
शब्बीर नाईक दिग्दर्शित 'स्वीटी सातारकर' (Sweety Satarkar Movie) चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच (Trailer Launched) करण्यात आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चागंला प्रतिसाद मिळतोय. चित्रपटातील खटकेबाज संवाद आणि गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'तू जेव्हा थैलीत होता ना तेव्हा मी पहिलीत होते', 'साडी बघायच्या वयात हा गाडी का बघतोय.', असे मजेशीर संवाद असणाऱ्या या चित्रपटातून आगळीवेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. हा चित्रपट येत्या 28 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
'स्वीटी सातारकर' या चित्रपटाची निर्मिती मुनाफ नाईक आणि संतोष साबळे यांनी केली आहे. तसेच शब्बीर नाईक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. संतोष मुळेकर यांनी या चित्रपटातील संगीत दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अमृता देशमुख, संग्राम समेळ, विजय निकम, गौरी जाधव, वंदना वाकनीस, पुष्कर लोणारकर, विनम्र भाबल, प्रशांत विचारे या कलाकारांच्या भूमिका आहेत. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या देसी लूकवर चाहते फिदा; पहा लाल साडीतील खास फोटो)
प्रेक्षकांना या चित्रपटात नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. मराठीतील हटके संवादामुळे या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता हलकीफुलकी कथा, उत्तम कलाकार, जबरदस्त संगीत असणारा 'स्वीटी सातारकर' चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. येत्या 28 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेकांनी चित्रपट प्रदर्शनाची वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे.