Swag Mazya Fatyavar Song In Girlz Movie: 'स्वॅग माझ्या फाट्यावर' म्हणत 'गर्ल्स' गॅंग सोबत थिरकली 'बॉईझ'ची टोळी (Watch Video)
Swag Mazya Fatyavar Song In Girlz Movie (Photo Credits: Youtube)

'बॉईज' (Boyz) आणि 'बॉईज 2' (Boyz 2) या धमाकेदार चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल देवरुखकर (Vishal Devrukhkar) यांचा नवा कोरा सिनेमा 'गर्ल्स' (Girlz) हा प्रदर्शनाच्या अगोदरच प्रेक्षकांमध्ये अनेकदा चर्चेचा विषय ठरत आहे. सुरुवातीला धम्माल ट्रेलर त्यानंतर आईच्या गावात (Aaichya Gavat) हे बनात गाणं घेऊन प्रेक्षकांची भेट घेतल्यावर आता 'स्वॅग माझ्या फाट्यावर' (Swag Mazya Fatyavar) म्हणत ही गर्ल्स गॅंग पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हे नवे गाणे नुकतेच लाँच करण्यात आले असून काहीच वेळात या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे या गर्ल्सच्या तिकडीसोबत बॉईज सिनेमातील खोडकर बॉईजची टोळी सुद्धा गाण्यामध्ये थिरकताना दिसून येत आहे. गर्ल्स मधील अंकिता लांडे (Ankita lande), केतकी नारायण  (Ketaki Narayan) आणि अन्विता फलटणकर (Anvita Faltankar)  यांच्या हटके अदा आणि बॉईज मधील सुमंत शिंदे (Sumant Shinde), प्रतीक लाड (Pratik Lad) यांची जुगलबंदी या गाण्यात दिसून येत आहे.

वरून लिखाते लिखित या गाण्याला मुग्धा कऱ्हाडे आणि स्वप्नील गोडबोले यांच्या आवाजात वेगळीच झिंग अनुभवायला मिळते. तरुणाईची हॅपनिंग वाईब अनुभवाची असेल तर हे गाणे त्याची झलक म्हणता येईल. याशिवाय वरून लिखाते आणि मुग्धा कऱ्हाडेच्या रॅपने गाण्याची रंगत अधिकच वाढली आहे.

Girlz चित्रपटातून होणार 'या' अभिनेत्रीचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

'स्वॅग माझ्या फाट्यावर'

'आयुष्यावर बोलू काही...' कार्यक्रमाचा अपमान असल्याचंं सांगत Girlz Poster चा संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्याकडून निषेध

दरम्यान,हृषिकेश कोळी लिखित, नरेन कुमार निर्मित गर्ल्स सिनेमामध्ये मुलींच्या रंजक भावविश्वाची सफर घडणार आहे. येत्या 29 नोव्हेंबर रोजी हा नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.