Girlz चित्रपटातून होणार 'या' अभिनेत्रीचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

या चित्रपटाच्या माध्यमातून विशाल आता मुलींच्या अनोख्या विश्वाची सफर घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि म्हणूनच त्यांनी तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. 'गर्ल्स' या चित्रपटातील तीन मुख्य अभिनेत्रींनपैकीच एक म्हणजे 'मती' अर्थातच अंकिता लांडे.

Girlz चित्रपटातून होणार 'या' अभिनेत्रीचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण
Girlz Poster (Photo Credits: Facebook)

'बॉईज' आणि 'बॉईज २' सारखे धमाकेदार चित्रपट देणारे दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांचा 'गर्ल्स' हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून विशाल आता मुलींच्या अनोख्या विश्वाची सफर घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि म्हणूनच त्यांनी तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. 'गर्ल्स' या चित्रपटातील तीन मुख्य अभिनेत्रींनपैकीच एक म्हणजे 'मती' अर्थातच अंकिता लांडे.

Ankita Lande (Photo Credits: File Image)

अभिनय क्षेत्रात काम मिळावे एक नावाजलेली अभिनेत्री व्हावे असे स्वप्न बऱ्याच मुली बघतात आणि मुंबई नावाच्या मायानगरीत येतात. त्यातीलच एक म्हणजे अंकिता लांडे. काम मिळवत असताना अंकिताने अनेक ऑडिशन्स दिल्या. योगायोग म्हणजे त्या वेळेस अंकिताने 'बॉईज 2' साठी ऑडिशन दिली आणि तिची निवड देखील झाली. परंतु नंतर काही गोष्टी आणि अभिनयातले अधिक बारकावे अंकिताला शिकण्याची आवश्यकता आहे असे दिग्दर्शकांना वाटले. त्यांनी अंकिताला 'बॉईज 2' चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून काम करण्यास सांगितले. 'बॉईज 2' चित्रपटाच्या वेळी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अंकिता या संपूर्ण टीमचा भाग होती. यावेळी तिने अभिनयासोबतच चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टी आत्मसात केल्या. अभिनयाच्या वर्कशॉप मध्येही ती सहभागी झाली. जेव्हा दिग्दर्शक विशाल देवरूखकरांनी 'गर्ल्स' चित्रपटाच्या कलाकारांची निवड आणि ऑडिशन सुरु केले तेव्हा, अंकिताने 'मती'या भूमिकेसाठी ऑडिशन दिली आणि तिची निवड झाली.

अंकिताच्या या निवड प्रक्रियेबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर सांगतात, " 'बॉईज 2' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर मी आणि माझ्या टीमने मुलीच्या भन्नाट जीवनावर चित्रपट करायचे ठरवले. यावेळी अंकिता आमच्या सोबतच होती. चित्रपटाची पटकथा पूर्ण झाल्यानंतर 'गर्ल्स' या सिनेमासाठी कलाकारांचा शोध सुरू झाला. नवीन कलाकारांना संधी द्यायची या विचाराने नवीन मुलींसाठी आम्ही ऑडिशन्स सुरू केल्या. अनेक ऑडिशन्स झाल्या मात्र मला आणि माझ्या टीमला मनासारखी 'मती' मिळत नव्हती. सर्वात शेवटी अंकिताने ऑडिशन दिली आणि आम्हाला आमची 'मती' मिळाली."

नक्की वाचा: बॉईज नंतर आता कहर करायला येत आहेत 'गर्ल्स', बोल्ड मराठी चित्रपटांच्या यादीत नव्या नावाची भरती

नुकतेच या सिनेमाचे टिझर पोस्टर लाँच करण्यात आले आहे. 'गर्ल्स' हा चित्रपट येणार असल्याचे समजल्यापासूनच सर्वांना या सिनेमात कोण मुख्य भूमिका साकारणार याबद्दल कुतूहल होते. मात्र आता या कुतूहलाचा शेवट झाला असून 'गर्ल्स' चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारी पहिली मुलगी 'मती' अर्थातच अंकिता लांडे हिचे नाव आणि चेहरा उघडकीस आले आहे.

या भन्नाट चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि कायरा कुमार क्रिएशनस प्रस्तुत 'गर्ल्स' हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 10, 2019 04:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).