ठरलं! गायिका कार्तिकी गायकवाड अडकणार विवाहबंधनात; रोनित पिसे सोबत 26 जुलै रोजी होणार साखरपुडा (See Photo)
कार्तिकी गायकवाड व रोनित पिसे (Photo Credit : Twitter)

'सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेले नाव म्हणजे कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad). इवलुश्या वयात कार्तिकी या शोची विजेती ठरली होती व आता ती एका नव्या आयुष्याला सुरुवात करत आहे. कार्तिकीचा 26 जुलैला साखरपुडा आहे. नुकताच कार्तिकीचा पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. कोरोनाच्या सावटामुळे हा अगदी छोटेखानी कार्यक्रम होता व त्यानंतर कार्तिकीचे लग्न ठरले. येत्या 26 जुलैला रोनित पिसेसोबत कार्तिकीचा साखरपुडा होणार आहे. सध्या सोशल मिडियावर रोनित व कार्तिकीचे फोटो व्हायरल होत आहेत.

2009 साली झी मराठीच्या 'सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स' हा शोद्वारे कार्तिकीने आपल्या करियरची सुरुवात केली होती. या शोदरम्याने तिने संबंध महाराष्ट्राचे मन जिंकले होते. का कर्यक्रमानंतरही तिने काही कार्यक्रम केले. तिने कलर्स वाहिनीवरील ‘राइझिंग स्टार’ या रिअॅलिटी शो मध्येही सहभाग घेतला होता ‘गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमाचे निवेदनही ती करत आहे. आता रोनित पिसे सोबत ती विवाहबंधनात अडकत आहे. रोनित पिसे मेकॅनिकल इंजिनिअर असून त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. महत्वाचे म्हणजे रोनितला देखील संगीताची आवड आहे. त्याला उत्तम तबला वाजवता येतो. त्याने तबल्याच्या तीन परीक्षा देखील दिल्या आहेत. त्यामुळे हे कपल दोघे मिळून आता संगीताचा वारसा पुढे नेणार आहेत. (हेही वाचा: बिग बॉस फेम शर्मिष्ठा राऊत हिचा तेजस देसाईसोबत साखरपुडा; अवघ्या 35 लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला सोहळा (See Photo))

पहा फोटो -

रोनित पिसे हा मुळचा पुण्याचा आहे. कार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांच्या मित्रपरिवारातील हे कुटूंब आहे. कार्तिकी व रोनितचे हे अरेंज मॅरेज आहे. सध्या तरी लग्नाची तारीख ठरली नसल्याचे कार्तिकीने सांगितले मात्र 26 जुलैला साखरपुडा पार पडणार आहे. आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत आणि कार्तिकी गायकवाड हे 'सा रे ग म प- लिटिल चॅम्प्स' चे स्पर्धक. यामध्ये कार्तिकी जरी विजेती ठरली असली तरी हे सर्वच गायक लोकप्रिय ठरले होते.