Shiv Jayanti 2019: नागराज मंजुळे यांनी न्युयॉर्कमध्ये साजरी केली शिवजयंती (Photos)
Nagraj Manjule (Photo Credit: Twitter)

Shivaji Maharaj Jayanti 2019: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीचा उत्साह, जल्लोष फक्त देशापूरता मर्यादीत राहिलेला नाही तर हा उत्सव जगभरात साजरा केला जातो. अमेरिकेतील न्युयॉर्क (New York) येथे शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. कन्सॉलेट जनरल ऑफ इंडिया, छत्रपती फाऊंडेशन आणि अल्बनी ढोल पथक यांच्या वतीने न्यूयॉर्क येथे शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित होते. त्याचबरोबर अमेरिकेतील भारतीयांनी देखील या कार्यक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमादरम्यान अभिनेता रितेश देशमुखनेही व्हिडिओद्वारे शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. विश्वविक्रमी रांगोळी, 13 फुटी जिरेटोप सह शिवजयंती निमित्त राज्यात विविध ठिकाणी साकारल्या भव्यदिव्य कलाकृती! (Photos)

तर नागराज मंजुळे यांनी कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळेस नागराज मंजुळे यांनी सेल्फी ट्विटवर शेअर केला आहे. "असा सेल्फी काढण्याचा मोह कधीतरीच होतो", अशा कॅप्शनसह नागराजने शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या वेशभुषेतील तरुणांसोबत सेल्फी काढला आहे.