सैराट फेम रिंकू राजगुरू ने कमी केले तब्बल 20 किलो वजन; जाणून घ्या तिचा डाएट प्लॅन
Rinku Rajguru (Photo Credits: Instagram)

Rinku Rajguru Weight Loss: सैराट फेम रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. एका सामान्य घरातून आलेली एका लहानशी मुलगी ते एक सुपरहिट अभिनेत्री असा एकूणच रिंकूच्या आयुष्याचा प्रवास आहे. सैराट नंतर प्रचंड यश मिळाल्यानंतर, रिंकूने ने कागर या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली. आणि आता लवकरच ती पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार आहे एका नव्या चित्रपटातून. 'मेकअप' या आगामी चित्रपटात, रिंकू प्रमुख पात्र साकारणार आहे. पण आज आम्ही तुम्हाला रिंकूबद्दल एक असं सिक्रेट सांगणार आहोत जे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

रिंकूने मागील काही महिन्यात तब्बल 20 किलो वजन घाटावले आहे. आणि त्यासाठी व्यायाम व डाएट याकडे ती काटेकोर पद्धतीने लक्ष देत आहे.

तिच्या आधीच्या चित्रपटाच्या वेळी लोकमत न्यूज 18 या वृत्तवाहिनीशी बोलताना रिंकूने आपला फिटनेस प्लॅन शेअर केला होता. ती सकाळी 4 वाजता उठून नियमित व्यायाम करते. त्यानंतर योगा करण्यावर देखील ती भर देते.

रिंकू तिच्या डाएट प्लॅनबद्दल सांगताना म्हणाली होती की ती एक विशिष्ठ डाएट प्लॅन फॉलो करते ज्यामध्ये ती सलाड खाण्यावर जास्त भर देते. तसेच तिला गोड खायला आवडत असले तरीही ते खाणं टाळते.  विशेष म्हणजे रिंकू कोणत्याही फिटनेस ट्रेनरकडे जात नाही. खरंतर तिची आईच रिंकूच्या व्यायामाची आणि डाएटची काळजी घेते.

Julali Gaath Ga Song in Makeup: रिंकू राजगुरु आणि चिन्मय उद्गगीरकर यांच्या लग्नसराईची सुंदर झलक दाखवणारे 'मेकअप' चित्रपटातील हे सुरेल गाणे एकदा पाहाच

सैराट फेम रिंकू राजगुरू ने कमी केले तब्बल 20 किलो वजन; जाणून घ्या तिचा डाएट प्लॅन Watch Video

दरम्यान, रिंकू मागील काही दिवसांपासून तिच्या आगामी चित्रपटामुळे जरा जास्तच चर्चेत आहे. तिचा साखरपुडा झाला असल्याचे बोलले जात होते, परंतु तसे प्रत्यक्षात घडले नसून फक्त चित्रपटातील एका गाण्यात दाखवण्यात आला होता. या चित्रपटात रिंकू पूर्वीच्या भूमिकेत दिसणार आहे तर अभिनेता चिन्मय उदगीरकर हा नीलचे पात्र साकारणार आहे.