Makeup Teaser: रावडी अंदाजातील रिंकू राजगुरू चा 'मेकअप' सिनेमाचा टीझर  रसिकांच्या भेटीला (Watch Video)
Makeup Teaser (Photo Credits: You tube)

सैराट फेम 'आर्ची' पुन्हा रावडी अंदाजात रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. 'मेकअप' (Makeup)या रिंकू राजगुरूच्या अगामी चित्रपटाचा टीझर नुकताच रीलिज करण्यात आला आहे. यामध्ये पुन्हा बिनधास्त अंदाजात रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) रसिकांच्या भेटीला येणार आहे. गणेश पंडित (Ganesh Pandit) दिग्दर्शित या सिनेमाची पहिली झलक दमदार आहे.

मेकअप टीझर

मेकअप सिनेमाच्या टीझरमध्ये रिंकू राजगुरू झिंगलेल्या अवस्थेत पहायला मिळाली आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये समान्य मुलगी, मेकअप आणि समजाची तिच्यावर यावरून होणारी तानेशाही यावर भाष्य करण्यात आले आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये केवळ रिंकू राजगुरूची झलक पहायला मिळली आहे. बिनधास्त अंदाजातील रिंकूचा हा अंदाज पाहून तिच्या चाहत्यांमध्ये नक्कीच सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

सैराट नंतर रिंकूने 'कागर' हा मराठी सिनेमा केला. त्यानंतर आता 'मेकअप' सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.