मराठीत होणा-या नवनवीन प्रयोगामुळे बॉलिवूडमधील ब-याच लोकांना किंबहुना अवघ्या बॉलिवूड जगताला मराठी सिनेमांसोबत मराठीतील कलाकारांची भुरळ पाडली आहे. त्यात नेहमी अव्वल स्थानावर आहेत ती सैराट फेम 'परश्या' आणि 'आर्ची'. या चित्रपटाने आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) सर्वसामान्य लोकांप्रमाणे बॉलिवूडमधील अनेक लोक चाहते झाले. बॉलिवूडकरांची पसंतीची पावती मिळालेल्या रिंकूला देखाल बॉलिवूडची भुरळ पडली आहे किंबहुना बॉलिवूडमध्ये सध्या लोकप्रिय झालेल्या आणि कमी कालावधीत आपल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या विशेषकरुन तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या एका कलाकारासोबत रिंकूला डेट ला जायचे आहे. कलर्स वाहिनीवरील 'एकदम कडक' या कार्यक्रमात तिने याबाबत मोठा खुलासा केला.
या कार्यक्रमाचा सूत्रधार जितेंद्र जोशी याने तिने 'तुला कोणासोबत डेटला जायला आवडेल' असा प्रश्न विचारल्यावर रिंकू कुणाचे नाव सांगते याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते. त्यावेळी तिने मला अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याच्यासोबत डेटला जायला आवडेल असे सांगून चाहत्यांना धक्काच दिला.
हेदेखील वाचा- बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने बॉडीगार्ड अतुल कांबळेसाठी मराठीतून लिहिली पोस्ट
याशिवाय काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीमधून तिनं तिच्या रिलेशनशिप स्टेटस बद्दलही खुलासा केला. रिंकून काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरुन तिच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. तिनं Ask Me Anything च्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारल्या. यावेळी एका चाहत्यानं तिला तुझा बॉयफ्रेंड आहे असा प्रश्न विचारला होता. चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर रिंकूनं नाही असं दिलं.
रिंकूचा सहअभिनेता आकाश ठोसर याने विकी कौशल याच्यासोबत 'लस्ट स्टोरीज' या वेबसिरीजमध्ये काम केले होते. त्यातील विकीची भूमिका रिंकूला खूप आवडली होती. त्यामुळे आता रिंकूची ही इच्छा पूर्ण होते का नाही याविषयी सर्वांना उत्सुकता आहे.