Priyanka Nick Wedding Mumbai Reception Party:  प्रियंका-निकच्या मुंबई रिसेप्शन पार्टीला आदिनाथ- उर्मिला कोठारे, उषा जाधव या मराठमोळ्या कलाकारांची उपस्थिती (Photos)
Priyanka - Nick Mumbai reception Party (Photo Credits: Yogen Shah)

Priyanka Nick Wedding Mumbai Reception Party : जोधपूरमध्ये बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)  आणि अमेरिकन पॉप गायक निक जोनस (Nick Jonas) विवाहबंधनात अडकले. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही परंपरेमध्ये प्रियंका आणि निकचं लग्न 1  डिसेंबरला धूमधडाक्यात पार पडलं. काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये प्रियंका आणि निकच्या लग्नाची पहिली रिसेप्शन पार्टी पार पडली आणि त्यानंतर आता मुंबईत दोन रिसेप्शन सोहळे रंगणार आहेत. त्यापैकी एक कुटुंबीयांसाठी आणि एक बॉलिवूडकरांसाठी ठेवण्यात आली आहे.

मुंबईत बुधवारी (19 डिसेंबरला) मुंबईच्या J W  Marriott, Juhu Mumbai हॉटेलमध्ये एक खास रिसेप्शन पार पडलं. त्यामध्ये प्रियंकाच्या कुटुंबातील काही व्यक्ती आणि सोबतच मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी उपस्थिती लावली होती. मुंबईतील पहिल्या रिसेप्शन सोहळ्यात मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे, उषा जाधव, राजश्री सचदेव उपस्थित होत्या. तसेच उर्मिला कोठारेसोबत आदिनाथ कोठारेदेखील या पार्टीमध्ये दिसला होता. 'व्हेंटिलेटर' या प्रियंकाची निर्मिती असलेल्या मराठी सिनेमाचा दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनीदेखील या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली होती.Priyanka Nick Reception Party : अशी रंगली प्रियंका आणि निकच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी; नरेंद्र मोदींची उपस्थिती ठरली लक्षणीय

 

Rajesh Mapuskar
Rajesh Mapuskar (Photo Credits: Yogen Shah)
Usha Jadhav
Usha Jadhav (Photo Credits: Yogen Shah)

 

View this post on Instagram

 

#NP Reception @priyankachopra @nickjonas #nickyanka #reception #priyankachopra #priyankaandnick

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare) on

केवळ मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये प्रियंका आणि निकचा विवाहसोहळा उमेद भवन पॅलेसमध्ये (Umaid Bhawan Palace) शाही अंदाजात पार पडला होता. मुंबईतील रिसेप्शन सोहळ्यानंतर प्रियंका आणि निक पुन्हा अमेरिकेला रवाना होणार आहेत.