Nagraj Manjule New Movie:  नागराज मंजुळेंचा नवा सिनेमा 'बापल्योक' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Baplyoka Photo credit insta

Nagraj Manjule New Movie: नागराज मंजूळे (Nagraj Manjule) यांचा  बापल्योक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागराज मंजूळे यांच्यासह त्यांचे मित्र मकरंद शशिमधू माने या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी उभे आहेत. नागराज मंजूळे हे नेहमीच नवनवीन कलाकारांना प्रोत्साहित करत असतात. चित्रपटासाठी आगळ्यावेगळ्या कल्पना घेत चित्रपट करतात. समाजातील वास्तवाचे दर्शन त्यांचा चित्रपटातून होत असते. मराठी चित्रपट सुष्टीत मकरंद माने आणि नागराज मंजूळे याचं दिग्दर्शक म्हणून नाव लौकिक आहे. नाळ, सैराट, फेंड्री यासारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. त्यांच्या चित्रपटाची कथा ही नेहमी हटके असते. तर यावेळी सुध्दा त्यांनी बापल्योक या चित्रपटासाठी मनाला भिडणारं कथानक तयार केलं आहे.

येत्या  २५ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  दिग्दर्शकांमध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक  या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत.‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे, आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘बापल्योक’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.  सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर आटपाट प्रोडक्शनच्याने शेअर केल आहे. बाप आणि लेकाची कहाणी यामध्ये पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aatpat (@aatpatproduction)

चित्रपटाविषयी बोलताना नागराज सांगतात,सरणारी वर्षं आणि वाढणारा सहवास यांच्या साथीने नाती मुरत जातात. अर्थात या नात्यात सूर गवसला तर आयुष्याचा प्रवास सुफळ संपूर्ण होतो. आजवर बाप लेकाचा प्रवास तेवढ्या ताकदीने चित्रपटातून मांडला गेला नाही. मकरंद याला हा प्रवास मांडावासा वाटला. मुख्य सहाय्यक दिग्दर्शक अमोल घरत आहेत. रंगभूषा संतोष डोंगरे, कास्टिंग योगेश निकम यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते शंतनू गंगणे आहेत.  लाईन प्रोडक्शनची जबाबदारी बहुरूपी प्रोडक्शन्सने सांभाळली आहे.