कुस्तीपटू खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांचा जीवनपट सिनेमाच्या भव्य पडद्यावर येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजूळे (Nagraj Manjule) यांनी ही घोषणा कोल्हापूर येथे केली आहे. खाशाबा जाधव (Khashaba Jadhav Movie) यांनी कुस्ती या क्रीडा प्रकारात भारताला पहिले ऑलम्पीक पदक मिळवून दिले. सर्वसामान्य मल्ल ते ऑलम्पीक पदक विजेता असा त्यांचा प्रवास प्रदीर्घ राहिला आहे. या प्रदीर्घ प्रवासातील संघर्ष चित्रपटात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुस्ती आणि क्रीडा वर्तुळातून चित्रपटाबाबत जोरदार उत्सुकता आहे. 'सैराट', 'झुंड' हे प्रसिद्ध चित्रपट आणि इतर काही लघूपटांच्या माध्यमातून नागराज मंजूळे रसिकांच्या भेटीला आले होते. या दोन्ही चित्रपटांना आणि इतर लघू पटांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडला कुस्ती या क्रीडा प्रकारावर सिनेमा बणने नवे नाही. या आधीही मराठीमध्ये कुस्तीमध्ये अनेक सिनेमे येऊन गेले आहेत. तर, बॉलिवूडमध्येही 'दंगल', 'सुलतान' यांसारखे काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मात्र, नागराज मंजूळे यांच्या चित्रपटांचा एकूण बाज पाहता हा चित्रपट इतरांपेक्षा वेगळा असेल अशी भावना नागराज मंजुळे यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. (हेही वाचा, खाशाबा जाधव: हुकणाऱ्या सामन्यात दाखवला डाव; ऑलिम्पिकमध्ये पदकावर कोरले नाव)
नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनातून साकारलेला तांबड्या मातीतील संघर्ष कसा साकारला जातो याबाबत उत्सुकता आहे. नागराज मंजुळे यांनी बोलताना सांगितले की, खाशाबा जाधव हे अत्यंत तळागाळातून आलेले आणि जागतिक किर्ती लाभलेले पैलवान होते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील संघर्ष सिनेमाच्या माध्यमातून पुढे यावे असे आम्हाला वाटले. त्यामुळे आम्ही खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा, Dr. Nagraj Manjule D. Litt: नागराज मंजुळे यांना डी वाय पाटील विद्यापीठाकडून डॉक्टरेट)
महाराष्ट्र राज्यातील गोळेश्वर गावात 1926 मध्ये खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जन्म झाला. जाधव यांना त्यांच्या वडिलांकडून कुस्तीचे धडे मिळाले. जे गावातील सर्वोत्तम कुस्तीपटूंपैकी एक होते. जाधव, तेव्हा 10 वर्षांचे होते, त्यांनी जलतरणपटू आणि धावपटू म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर कुस्तीपटू होण्यासाठी वडिलांकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.