Dr. Nagraj Manjule D. Litt: नागराज मंजुळे यांना डी वाय पाटील विद्यापीठाकडून डॉक्टरेट
Nagraj Manjule D. Litt | (Photo Credits: Facebook)

पिस्तुल्या (Pistulya), फॅंड्री (Fandry), सैराट (Sairat) आणि आता झुंड (Jhund) असे एक एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट देऊन प्रेक्षक आणि रसिकांच्या मनात घर करणाऱ्या नागराज मंजूळे यांचा डी वाय पाटील विद्यापीठाकडून (DY Patil University) मोठा सन्मान करण्यात आला आहे. डी वाय पाटील विद्यापीठाने नागराज मंजळू यांना सन्मानाची डॉक्टरेट (D. Litt) ही पदवी दिली आहे. नागराज मंजूळे यांनी चित्रपट क्षेत्रात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा दिलेल्या विविध योगदानाबद्दल त्यांचा सन्मान केल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. या सन्मानातूनच त्यांना डी. लीट (Dr. Nagraj Manjule D. Litt) बहाल आली.

प्रा. हनुमंत लोखंडे यांनी नागराज मंजुळे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाे डी.लीट बहाल केल्याची माहिती दिली. नागराज मंजुळे यांचे डॉक्टरेट पदवी स्वीकारतानाचे फोटो शेअर करत प्रा. लोखंडे यांनी म्हटले की, संघर्षाच्या काळात आपण एम.फिल किंवा SET/NET व्हावे अशी आपली इच्छा होती. त्यासाठी आपण पुणे विद्यापीठात चकरा मारतानाचे दिवस आजही मला आठवतात. आपण इयत्ता 10 सोडल्यापासूनचा रे डॉक्टर ऑफ लेटर्स (D. Litt.) पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. याचा साक्षीदार होणे हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. (हेही वाचा, Jhund Trailer: Amitabh Bachchan यांची मुख्य भूमिका असलेला नागराज मंजुळेंच्या 'झुंड' सिनेमा दमदार ट्रेलर जारी)

चित्रपट क्षेत्रात पदार्पण केल्यापासूनच नागराज मंजुळे यांनी वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविण्यावर भर दिला. पिस्तुल्या (Pistulya), फॅंड्री (Fandry), सैराट (Sairat) आणि आता झुंड (Jhund) असे त्यांनी एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. सैराट हा मराठी भाषेत निर्मिती झालेला प्रादेशिक चित्रपट असूनही या चित्रपटाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा धंदा केला. या चित्रपटापूर्वी आलेला नागराज मजुळे यांच्या 'फँड्री' चित्रपटाचीही जोरदार चर्चा झाली. विशेष म्हणजे हा चित्रपट पूर्णपणे 'ब्लॅक अँड व्हाईट' होता. या चित्रपटालाही अनेक विविध पुरस्कार मिळाले.