Smile Please Shwaas De Song: मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या 'स्माईल प्लिज' सिनेमातील 'श्वास दे' गाणे रसिकांच्या भेटीला! (Watch Video)
Smile Please Movie Shwaas De Song (Photo Credits: Youtube)

मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर ही नवी जोडी घेऊन 'स्माईल प्लिज' (Smile Please) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या फर्स्ट लूक, टीझर नंतर आता सिनेमातील 'श्वास दे' (Shwaas De) हे गाणे रसिकांसमोर आले आहे. मंदार चोळकर याच्या लेखणीतून अवतरलेले हे गीत रोहन प्रधान याने गायले आहे. तर रोहन रोहन याने हे गीत संगीतबद्ध केले आहे.

या सिनेमात मुक्ता बर्वे एका फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसत आहे आणि फोटोग्राफरच्या आयुष्यातील खास शब्द म्हणजे 'स्माईल प्लिज.' आयुष्यातील चढ-उतारात कसे हसत राहावे, हा संदेश या सिनेमातून देण्यात आला आहे. असेच सकारात्मक आशयाचे 'श्वास हे' गाणे प्रेक्षकांना नक्कीच भावेल.

ट्विट:

पहा गाण्याचा व्हिडिओ:

'हृदयांतर' सिनेमानंर फॅशन डिझायनर आणि निर्माता विक्रम फडणीस पुन्हा एकदा नवा मराठी सिनेमा घेऊन सज्ज झाला आहे. या सिनेमात मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या शिवाय प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. 19 जुलैला हा सिनेमा सिनेमागृहात धडकणार आहे.