Vijay Kadam Passed Away: मराठी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ आणि प्रसिध्द अभिनेते विजय कदम (Vijay Kadam) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून कुटुंब, मित्र परिवार आणि चाहत्यांना धक्काच बसला आहे. गेल्या काही वर्षापासून ते कर्करोगाशी त्रस्त होते. आज सकाळी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त माध्यामांना दिली. अंधेरी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक कलाकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रध्दांजली अर्पण केले. (हेही वाचा- चित्रपट निर्मात्याला 2.65 कोटी रुपयांचा लावला गंडा, लेखक Mahesh Pandey यांना अटक)
ऐंशी ते नव्वदच्या दशकात विजय यांनी मराठी चित्रपटात कामे केली. चित्रपटासोबत मालिका आणि नाटकात देखील कामे केली. दे दणादण, दे धडक बेधडक, हळद रुसली, कुंकू हसलं अश्या अनेक मराठी चित्रपटांत कामे करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. टूरटूर, विच्छा माझी पूरी करा अश्या नाटकांत देखील कामे केली. विजय यांनी अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भुमिका निभावल्या.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं दुःखद निधन
मनोरंजन सृष्टीवर पसरली शोककळा
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏#vijaykadam #rip #marathiactor pic.twitter.com/2An6Vfk7lI
— Majja (@itsmajja) August 10, 2024
मुंबईतील अंधेरी येथे ते वास्तवास होते. वयाच्या ६७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या पाश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी अंधेरी येथील ओशिवरा येथील स्माशनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.