Mahesh Pandey Arrested PHoto Credit TWITTER

Mumbai Extortion Case: मुंबईत एका चित्रपट निर्मात्याला 2.65 कोटी रुपयांचा गंडा लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातून पोलिसांनी स्क्रिप्ट राईयटरला अटक केली आहे. महेश पांडे अस अटक करण्यात आलेल्या लेखकाचे नाव आहे. मुंबईतील आंबोली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. 6 ऑगस्ट रोजी महेश पांडे यांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. (हेही वाचा- निक्की तांबोळीनं केलं छोटा पुढारीला किस; बिग बॉसच्या प्रोमाचा व्हिडिओ व्हायरल)

मिळालेल्या माहितीनुसार, निर्माते जतिन सेठी यांनी फसवणूक केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पांडे यांच्यावर संयुक्त प्रकल्पाच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केल्याचा आरोप कण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणात महेश पांडे यांच्या पत्नीविरुध्द लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे.

सेठी यांच्या बॅंक खात्यात 2.65 कोटी रुपये जमा केले जातील अशी आश्वासन देऊन पांडे यांना प्रसार भारतीकडून पैसे मिळाल्याचा आरोप सेठी यांनी केला. मात्र, बऱ्याच दिवसांनंतरही त्यांना पैसे मिळाले नाही. त्यांचे फसवणूक झाल्याचे लक्ष्यात येताच, पोलिस ठाणे गाठले. पेमेंटबाबत सेठीच्या ब्रॉडकास्टरला ईमेल पाठवले होते हे दाखवण्यासाठी पांडेने बनावट ईमेल आयडी तयार केला होता परंतु त्याऐवजी त्याने 2.65 कोटी स्वत: साठी वापरला असं चौकशीतून समोर आले.